मित्रांनो महाराष्ट्रातील बी-फार्मसी प्रवेश प्रक्रियेत यंदा अभूतपूर्व स्थिती पाहायला मिळत आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET Cell) मार्फत राबवण्यात आलेल्या 2025 च्या प्रवेश प्रक्रियेत तिसऱ्या फेरी नंतरही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या आहेत. विद्यार्थ्यांचा फार्मसी अभ्यासक्रमाबाबतचा कल कमी होताना दिसतो, आणि याच पार्श्वभूमीवर तिसऱ्या फेरीचे निकाल चिंतेचे चित्र सादर करतात.

तिसऱ्या फेरीत 6,921 विद्यार्थ्यांना जागा allot झाल्या होत्या; परंतु त्यापैकी फक्त 3,615 विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केला. म्हणजेच 48% विद्यार्थ्यांनी allotted सीट असूनही प्रवेश नाकारला. बी-फार्मसी कोर्ससाठी राज्यात एकूण 46,109 जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी पहिल्या तीन फेर्यांमध्ये फक्त 28,419 जागा भरल्या असून तब्बल 17,690 जागा अजूनही रिक्त आहेत. ही टक्केवारी जवळपास निम्मी असल्याने प्रवेश प्रक्रियेवर आणि फार्मसी शिक्षण क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे वाचा

या परिस्थितीमागे अनेक कारणे सांगितली जातात. सर्वात मोठे कारण म्हणजे PCI च्या मान्यतेत झालेला विलंब. PCI approval प्रक्रियेच्या उशिरामुळे प्रवेश यंत्रणेवर मोठा परिणाम झाला व विद्यार्थ्यांना CET नंतर चार महिन्यांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागली. तसेच फार्मसी क्षेत्रातील रोजगार संधी, salary package आणि career growth बाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. अनेकांनी Nursing, B.Sc., Engineering आणि Paramedical कोर्सेसकडे वळण्याचा निर्णय घेतला.

आता पुढे चौथी फेरी आणि संस्थात्मक फेरी होणार असून उरलेल्या जागा भरल्या जातील, अशी अपेक्षा आहे. कॉलेजेसकडून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विशेष ऑफर, सुविधांचे सादरीकरण आणि placement assurance देण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी या टप्प्यावर योग्य माहिती घेऊन, कॉलेजची गुणवत्ता, लॅब सुविधा आणि प्लेसमेंट रेकॉर्ड तपासून निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..