महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभिमानाचा क्षण समोर आला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील २५ गुणवंत विद्यार्थ्यांची अमेरिकेतील नासा (NASA – Kennedy Space Center) येथे १० दिवसांच्या शैक्षणिक अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे. ‘पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पा’अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देणे हा आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी राज्यभरातून तब्बल १७,००० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यातून 3 टप्प्यांतील कसून निवड प्रक्रियेनंतर ६ वी व ७ वीतील ९ मुली आणि १६ मुलांचे प्रतिनिधी पथक तयार झाले आहे.
विद्यार्थ्यांचा चमू १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे मुंबई येथून अमेरिकेसाठी रवाना झाला. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय प्रवास करत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि भावनांचा मिलाफ दिसत होता. या प्रवासात विद्यार्थी NASA Kennedy Space Center, Smithsonian National Air & Space Museum, NASA Earth Information Center तसेच San Francisco मधील प्रमुख टेक कंपन्यांना भेट देणार आहेत. रॉकेट तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, पृथ्वी निरीक्षण प्रणाली आणि भविष्य तंत्रज्ञानाबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने त्यांच्या विज्ञानावरील उत्सुकतेत मोठी वाढ होणार आहे.
या संपूर्ण उपक्रमात आयुका (IUCAA) चे शास्त्रज्ञ समीर दुर्डे आणि चार अनुभवी शिक्षिका विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आयुकाने विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते, ज्यात वैज्ञानिक संकल्पना, आंतरराष्ट्रीय संशोधन पद्धती, इंग्रजी संवादकौशल्य आणि शिष्टाचार यांचे प्रशिक्षण दिले गेले.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शिस्त, सुरक्षा आणि टीमवर्क यांचे पालन करण्याचा सल्ला दिला. हा दौरा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवी दारे उघडणारा, प्रेरणादायी आणि भविष्याला दिशा देणारा ठरणार आहे.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..






