मित्रांनो रेल्वेची नोकरी म्हणजे स्थैर्य, प्रतिष्ठा आणि आयुष्यभराची खात्रीशीर कमाई. आता ती संधी पुन्हा एकदा दार ठोठावत आहे कारण रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) कडून असिस्टंट लोको पायलट (ALP) भरती 2024 च्या अंतिम टप्प्याची घोषणा झाली आहे. हजारो उमेदवार ज्यांनी वर्षभर मेहनत घेतली, त्यांच्यासाठी आता आला आहे फायनल कॉल. 13 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या Document Verification आणि वैद्यकीय तपासणी (Medical Test) या प्रक्रियेतूनच उमेदवारांची निवड होणार आहे. त्यामुळे हीच ती वेळ आहे. जिथे तुमच्या स्वप्नातील रेल्वे नोकरीकडे जाणारी शेवटची पायरी सुरू होते.
RRB ALP 2025: असिस्टंट लोको पायलट DV आणि मेडिकल टेस्ट 13 ऑक्टोबरपासून सुरू; Admit Card 9 ऑक्टोबरला जारी
आरआरबीच्या नोटिफिकेशननुसार, आरआरबी चंदीगड झोनसाठी 13 ते 21 ऑक्टोबर 2025 दरम्यान डी.व्ही. प्रक्रिया पार पडेल. तर आरआरबी रांची झोनसाठी 13 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि वैद्यकीय तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या झोनच्या वेबसाइटवरून वेळापत्रक आणि ठिकाणाची माहिती घेणे आवश्यक आहे.
मेडिकल टेस्टची माहिती
डी.व्ही. टेस्ट झाल्यानंतर पुढील दिवशी वैद्यकीय तपासणी (Medical Examination) घेतली जाईल. रेल्वे क्षेत्रातील नोकरीसाठी उमेदवार शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या फिट असणं अत्यावश्यक आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान उमेदवाराची दृष्टी, श्रवणशक्ती आणि शारीरिक क्षमता तपासली जाईल.
आवश्यक कागदपत्रांची यादी:
डी.व्ही. प्रक्रियेसाठी उमेदवारांनी खालील कागदपत्रे बरोबर आणावीत,
- अर्जाची प्रिंट कॉपी
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
- जन्मतारीख दाखवणारे प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
- फोटो ओळखपत्र (आधार, पॅन, पासपोर्ट)
- दोन पासपोर्ट साइज फोटो
- वैद्यकीय फिटनेसशी संबंधित कागदपत्रे (जर मागितली असतील तर)
टीप: जर अर्जात दिलेली माहिती आणि कागदपत्रे यामध्ये विसंगती आढळली, तर उमेदवाराची उमेदवारी रद्द होईल.
Admit Card संबंधित माहिती
डी.व्ही. आणि मेडिकल टेस्टसाठी आरआरबी एएलपी Admit Card 9 किंवा 10 ऑक्टोबर 2025 रोजी जारी करण्यात येणार आहेत. हे Admit Card उमेदवारांना फक्त ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध होतील. उमेदवारांना रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येतील. ऑफलाइन कॉल लेटर पोस्टद्वारे पाठवले जाणार नाहीत.
Admit Card डाउनलोड करण्याची प्रक्रिया:
- आपल्या संबंधित RRB झोनच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “CEN 1/2024 Assistant Loco Pilot DV Admit Card” या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
- ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
- Admit Card स्क्रीनवर दिसेल, त्याचा PDF डाउनलोड करून प्रिंटआउट काढा.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..







