मित्रांनो मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ संस्थेने एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. राज्य परीक्षा परिषद आणि ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (SARTHI)’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून आता या विद्यार्थ्यांना संगणक टंकलेखन (Typing) आणि लघुलेखन (Shorthand) कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.
ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. टंकलेखन आणि लघुलेखन या दोन्ही परीक्षा दरवर्षी दोनदा राज्य परीक्षा परिषद आयोजित करते. राज्यभरातील तीन हजारांहून अधिक टंकलेखन संस्थांमधून दरवर्षी जवळपास ३ ते ४ लाख विद्यार्थी या परीक्षा देतात. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे हे कोर्स करणे कठीण जाते. त्यामुळे आता या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना शुल्कप्रतीपूर्ती मिळेल आणि त्यांना प्रशिक्षण पूर्णतः विनामूल्य मिळेल.
सध्या ‘अमृत’ या संस्थेमार्फत इतर मागास व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना संगणक टंकलेखन शुल्काचा परतावा मिळत आहे. याच धर्तीवर ‘सारथी’ संस्थेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या योजनेमुळे मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी वाढतील आणि सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात टायपिंग किंवा लघुलेखनाची मागणी पूर्ण करता येईल.
संगणक टंकलेखन परीक्षेसाठी प्रति विषय 6,500 रुपये आणि लघुलेखन परीक्षेसाठी 5,300 रुपये शुल्क आकारले जाते. हे शुल्क ‘सारथी’कडून परत दिले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.
या उपक्रमामुळे मराठा समाजातील युवकांना केवळ आर्थिक मदतच नाही, तर स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची संधी मिळेल. रोजगार, व्यवसाय आणि सरकारी नोकरीच्या संधींसाठी हे कौशल्य त्यांना सक्षम बनवेल.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..





