मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून क्लर्क (Prelims) परीक्षा 2025 चा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. देशभरातील लाखो उमेदवार या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण या निकालावर त्यांचा मेन परीक्षेचा मार्ग खुला होणार आहे. SBI हा देशातील सर्वात मोठा बँकिंग भरती संस्थांपैकी एक असल्यामुळे या परीक्षेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद असतो.

हे वाचा

SBI Clerk Prelims Result 2025: एसबीआय क्लर्क प्रिलिम्स निकाल लवकरच जाहीर, असे करा चेक

परीक्षेचे आयोजन आणि पदांची संख्या

एसबीआय क्लर्क प्रिलिम्स परीक्षा 20, 21 आणि 27 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. या भरतीद्वारे एकूण 6589 पदांची भरती केली जात आहे. यात 5180 रेग्युलर आणि 1409 बॅकलॉग पदांचा समावेश आहे. SBI क्लर्क ही बँकिंग क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि मागणी असलेली नोकरी असल्यामुळे यात स्पर्धा अत्यंत तीव्र असते.

कॅटेगरीनुसार जागांची माहिती

कॅटेगरीपदांची संख्या
General (सर्वसाधारण)2225
EWS (आर्थिक दुर्बल घटक)508
OBC (इतर मागासवर्गीय)1179
SC (अनुसूचित जाति)788
ST (अनुसूचित जनजाती)450
एकूण6589

या भरतीमध्ये जनरल, EWS, OBC, SC आणि ST अशा विविध श्रेणींमध्ये पदांचे वाटप करण्यात आले आहे. सर्वाधिक जागा जनरल कॅटेगरीसाठी तर त्यानंतर OBC आणि SC श्रेणीसाठी आहेत. आरक्षण धोरणाप्रमाणे प्रत्येक कॅटेगरीतील उमेदवारांसाठी ठराविक जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

निवड प्रक्रिया कशी असेल?

  • एसबीआय क्लर्क भरती प्रक्रियेत प्रथम प्रिलिम्स परीक्षा होते.
  • यात पात्र होणाऱ्या उमेदवारांना पुढील टप्प्यातील मेन परीक्षा द्यावी लागते.
  • मेन परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना स्थानिक भाषा चाचणी द्यावी लागते. उमेदवाराने अर्जात ज्या भाषेची निवड केली असेल, त्या भाषेची परीक्षा येथे घेतली जाते.

निकाल कसा तपासावा?

  • निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  • त्यानंतर “Careers” सेक्शनमध्ये जाऊन SBI Clerk Prelims Result 2025 या लिंकवर क्लिक करावे.
  • लॉगिन करण्यासाठी उमेदवारांना रोल नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागेल.
  • निकाल डाउनलोड करून त्याचा प्रिंटआउट घेणे देखील आवश्यक आहे.
हे वाचा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..