महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम नुकताच जाहीर केला आहे. यंदापासून राज्य सरकारने शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलून 5वी ऐवजी चौथी आणि आठवीऐवजी सातवी असा निर्णय घेतल्याने ही परीक्षा नव्या स्वरूपात होणार आहे. अभ्यासक्रम जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असली तरी परीक्षेसाठी लागणारी मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
सध्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीची पुस्तके शाळांकडे उपलब्ध आहेत. परंतु चौथी आणि सातवीच्या नव्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्य परीक्षा परिषदेकडून कोणतेही मार्गदर्शक पुस्तक अद्याप प्रकाशित केलेले नाही. शासनाचा निर्णय अचानक जाहीर झाल्याने खासगी प्रकाशन संस्थांनाही नवीन पद्धतीची पुस्तके तयार करण्यास पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे बाजारात कोणत्याही प्रकाशकांची मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध नसल्याने शिक्षक आणि पालक संभ्रमावस्थेत आहेत.
या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत दोन पेपर असतील. पहिला पेपर प्रथम भाषा आणि गणित विषयांचा असून त्यात 75 प्रश्न व 150 गुण असतील. दुसऱ्या पेपरमध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी विषयांचा समावेश आहे. या पेपरमध्येही 75 प्रश्न आणि 150 गुणांची संरचना ठेवण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेत 30 टक्के सोपे, 40 टक्के मध्यम आणि 30 टक्के कठीण स्वरूपाचे प्रश्न असतील.
राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी सांगितले की, चौथी आणि सातवीच्या पुस्तकांची निर्मिती सुरू असून तयार होण्यासाठी काही वेळ लागेल. तोपर्यंत पाचवी आणि आठवीच्या जुन्या शिष्यवृत्ती पुस्तकांतून अभ्यासक्रमातील संबंधित भाग वगळून प्राथमिक तयारी करता येऊ शकते. मात्र कमी वेळात विद्यार्थ्यांना योग्य तयारी करून घेण्याचे आव्हान शिक्षकांसमोर उभे आहे. मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना पूर्णपणे नियोजनबद्ध तयारी करणे शक्य होईल.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..






