मित्रांनो यूजीसी नेट डिसेंबर 2025 परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्राबाबत महत्त्वाची अपडेट आहे. National Testing Agency (NTA) कडून ही परीक्षा आयोजित केली जाते आणि नियमांनुसार प्रवेशपत्र परीक्षा तारखेच्या काही दिवस आधी ऑनलाइन जाहीर केले जाते.
प्रवेशपत्र कधी येणार?
परीक्षा 31 डिसेंबर 2025 पासून सुरू होत असल्याने, UGC NET Admit Card 2025 आज किंवा 27 डिसेंबर 2025 रोजी उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारांनी नियमितपणे अधिकृत वेबसाइट तपासत राहावे.
परीक्षा तारखा
यूजीसी नेट डिसेंबर 2025 परीक्षा 31 डिसेंबर 2025, 2, 3, 5, 6 व 7 जानेवारी 2026 या तारखांना आयोजित केली जाणार आहे. परीक्षा संगणक आधारित (CBT) पद्धतीने होईल.
शिफ्ट वेळा
दररोज दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3.00 ते संध्याकाळी 6.00 अशी असेल.
प्रवेशपत्र कुठे मिळेल?
UGC NET Admit Card 2025 फक्त ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होईल. उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वरूनच प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
डाउनलोड करण्याची प्रक्रिया?
- वेबसाइटवर जाऊन Admit Card UGC-NET Dec 2025 is LIVE.
- या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर Application Number, Date of Birth आणि Security Pin भरून सबमिट केल्यावर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
- ते डाउनलोड करून प्रिंट घ्यावी.
परीक्षा केंद्रासाठी आवश्यक कागदपत्रे
परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्राची प्रिंटेड कॉपी आणि एक वैध ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत असणे अनिवार्य आहे.




