मित्रांनो भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित “विकसित भारत बिल्डाथॉन 2025” या नवोन्मेष स्पर्धेसाठी आज म्हणजेच 11 ऑक्टोबर 2025 हा नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि स्वदेशी उपाययोजना तयार करण्याची ही उत्तम संधी आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नवे विचार, सर्जनशीलता आणि आत्मनिर्भरतेचा भाव जागृत करणे हा आहे.

या बिल्डाथॉनचे आयोजन शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, अटल इनोव्हेशन मिशन (NITI Aayog) आणि AICTE यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. देशभरातील 1.3 लाख शाळांमधील सुमारे 1 कोटी विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. या कार्यक्रमात इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. प्रत्येक शाळेला 6 ते 7 विद्यार्थ्यांची टीम तयार करून प्रोजेक्ट आयडिया सादर करावी लागते.

हे वाचा

या बिल्डाथॉनमध्ये चार मुख्य थीम्स ठेवण्यात आल्या आहेत.

  • आत्मनिर्भर भारत: स्वदेशी उपाय आणि सिस्टम तयार करणे.
  • स्वदेशी: पारंपरिक आणि मौलिक कल्पना विकसित करणे.
  • वोकल फॉर लोकल: स्थानिक उत्पादने आणि उद्योगांना प्रोत्साहन देणे.
  • समृद्धी: सर्वसमावेशक विकासाचा मार्ग स्वीकारणे.

नोंदणीसाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइट vbb.mic.gov.in वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. त्यानंतर 14 ते 31 ऑक्टोबरदरम्यान प्रोजेक्ट सबमिट करता येईल. मुख्य लाइव्ह बिल्डाथॉन 13 ऑक्टोबर 2025 रोजी होणार असून, विजेत्यांची घोषणा डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना फक्त स्पर्धेचा नाही, तर भारताच्या विकासात प्रत्यक्ष योगदान देण्याचा अनुभव देतो.

हे वाचा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..