आजचा दिवस फक्त एक तारीख नाही, तर हजारो वर्षांच्या इतिहासाचे आणि अनमोल क्षणांचे साक्षीदार आहे. 23 सप्टेंबरला सूर्य आणि पृथ्वी यांचा अद्भुत संगम होतो, दिवस आणि रात्रीची लांबी जवळजवळ सारखी होते, ज्याला खगोलशास्त्रात Equinox म्हणतात. याच दिवशी अनेक महान व्यक्तींचा जन्म, ऐतिहासिक घटना, आणि नवे प्रवास सुरु झाले आहेत. चला, जाणून घेऊया या दिवशी घडलेल्या काही विस्मयकारक घटना आणि रोचक तथ्ये, जी तुमच्या ज्ञानाला नवे रंग देतील.

23 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना

  • 1803: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई. (दुसरे इंग्रज-मराठा युद्ध)
  • 1846: गणिती आकडेमोड करून नेपच्यून ग्रहाचा शोध लावला (अर्बेन ली व्हेरिअर).
  • 1884: रावबहादूर नारायण लोखंडे (महात्मा फुलेंचे सहकारी) यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन.
  • 1905: आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे वेगेळे होण्याचा निर्णय.
  • 1908: कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना.
  • 1932: हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव.
  • 1983: सेंट किट्स, नेव्हिस देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • 2002: मोझिला फायरफॉक्स ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित.
  • 2022: कोरोना रोगामुळे दोन वर्षांच्या बंदीनंतर भूतानने आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यंटन पुन्हा सुरु. (भूतान)
  • 2019: या प्रसिद्ध कंपनीने दिवाळखोरी जाहीर. किमान ६ लाख प्रवाशी ग्राहक जगभरात अडकले. (थॉमस कूक ग्रुप कंपनी)
  • 2004: वादळामुळे किमान ३ हजार लोकांचे निधन. (चीन चक्रीवादळ हैती)
  • 1943: इटालियन सोशल रिपब्लिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाझी कठपुतळी राज्याची स्थापना (दुसरे महायुद्ध).
  • 1905: नॉर्वे आणि स्वीडन यांच्यात शांतता करार (कार्लस्टॅड करार).
  • 1889: निन्टेन्डो कंपनी लिमिटेड स्थापन.
  • 1641: १,००,००० पौंड सोन्याचा खजिना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले. (मर्चंट रॉयल जहाज)

23 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती

  • 1215: कुबलाई खान (मंगोल सम्राट)
  • 1771: कोकाकु. (जपानी सम्राट)
  • 1861: रॉबर्ट बॉश (बॉश कंपनी चे संस्थापक)
  • 1903: युसूफ मेहेर अली (समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक )
  • 1908: रामधारी सिंह दिनकर (देशभक्त, हिन्दी साहित्यिक)
  • 1911: राप्पल संगमेश्वर कृष्णन. (भारतीय भौतिकशास्त्रज्ञ)
  • 1914: ओमर अली सैफुद्दीन (तिसरा). (ब्रुनेईचा राजा)
  • 1915: नोबेल पारितोषिक विजेते क्लिफर्डशुल. (अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ)
  • 1917:आसिमा चॅटर्जी (भारतीय रसायनशास्त्रज्ञ )
  • 1919: देवदत्त दाभोळकर (पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ)
  • 1920: भालबा केळकर (नाट्य लेखक, अभिनेते)
  • 1943: तनुजा. (अभिनेत्री)
  • 1950: डॉ. अभय बंग. (समाजशास्त्रज्ञ)
  • 1952: अंशुमान गायकवाड. (क्रिकेटपटू)
  • 1957: कुमार सानू. (पार्श्वगायक)
  • 2000: सुवर्ण पदक विजेते श्रेया अग्रवाल (भारतीय रायफल नेमबाज)
  • 1951: भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक पी. आर. क्रिष्णा कुमार ( एव्हीपी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक)
  • 1941: जॉर्ज जॅक्सन (अमेरिकन कार्यकरर्ते,लेखक, ब्लॅक गुरिल्ला कुटुंबाचे सह-संस्थापक)
  • १९३५: प्रेम चोप्रा (भारतीय अभिनेते)
  • 1931: हिली क्रिस्टल (अमेरिकन व्यापारी, CBGB चे संस्थापक )
  • 1926: आंद्रे कॅसॅग्नेस (फ्रेंच तंत्रज्ञ, खेळणी निर्माते)
  • 1881: होमी मोदी (उद्योगपती, प्रशासक)

23 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती

  • 1858: अधिकारी ग्रँट डफ (मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश)
  • 1870: प्रॉस्पर मेरिमी (फ्रेंच लेखक, इतिहासकार,पुरातत्त्वज्ञ)
  • 1882: फ्रेडरिक वोहलर (जर्मन रसायनशास्त्रज्ञ)
  • 1939: सिग्मंड फ्रॉईड (आधुनिक मानसशास्त्राचा जनक)
  • 1964: भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर (नाटककार)
  • 1999: गिरीश घाणेकर (मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते).
  • 2004: डॉ. राजा रामण्णा (शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष)
  • 2012: कांतिलाल गिरीधारीलाल ऊर्फ के. लाल (जादूगार).
  • 2015: दयानंद सरस्वती (भारतीय संन्यासी,तत्त्वज्ञ)
  • 2020: भूपेश पांड्या (भारतीय चित्रपट अभिनेते)
  • 1929: नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड अॅडॉल्फ झिसिमंडी (ऑस्ट्रियन-जर्मन रसायनशास्त्रज्ञ)