मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी शिक्षण क्षेत्रात यंदा चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. UG Agriculture Admission 2025 मध्ये हजारो जागा रिक्त राहिल्याने राज्यातील आठ कृषी महाविद्यालयांवर बंद होण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चांगल करिअर मानले जाणारे हे क्षेत्र आता त्यांच्या पसंतीतून हळूहळू मागे पडत आहे.
सीईटी सेलच्या आकडेवारीनुसार, यंदा कृषी अभ्यासक्रमांसाठी एकूण 16,829 जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी फक्त 13,892 जागांवर प्रवेश झाले, तर तब्बल 2,937 जागा रिक्त राहिल्या. प्रवेशाचा सरासरी टक्का 82.55% असून, सरकारी संस्थांमध्ये 95.32% तर खासगी संस्थांमध्ये फक्त 79.22% प्रवेश झाले आहेत. विशेष म्हणजे, बी.टेक (कृषी अभियांत्रिकी) मध्ये 840 पैकी 498 जागा, तर बी.टेक (बायोटेक्नॉलॉजी) मध्ये 987 पैकी 646 जागा भरल्या गेल्या आहेत.
तज्ञांच्या मते, या घटामागे काही गंभीर कारणे आहेत. अभ्यासक्रमात आधुनिक बदलांचा अभाव, सरकारी नोकऱ्यांची कमी संधी, खासगी क्षेत्रातील अस्थिरता आणि संशोधन सुविधांची कमतरता. आजच्या काळात शेतीत ड्रोन, IoT आणि डेटा विश्लेषण यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर होत असला तरी कृषी शिक्षण त्यापासून दूर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि रुची दोन्ही घटले आहेत.
महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेच्या महासंचालक वर्षा उंटवाल यांनी सांगितले की, “प्रवेश प्रक्रिया नुकतीच संपली असून, लवकरच आकडेवारीचा सखोल अभ्यास करून निर्णय घेतला जाईल.”
कृषी शिक्षण वाचवायचे असेल, तर आधुनिक अभ्यासक्रम, औद्योगिक भागीदारी आणि नव्या तंत्रज्ञानाचा समावेश अत्यावश्यक आहे. अन्यथा, पुढील काही वर्षांत कृषी महाविद्यालयांची संख्या आणि प्रतिष्ठा दोन्ही घटण्याची शक्यता आहे.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..






