मित्रांनो शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी राज्यातील बी.एड. (Bachelor of Education) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील 483 बी.एड. महाविद्यालयांमध्ये एकूण 36,698 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी तब्बल 33,877 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून प्रवेशाची एकूण टक्केवारी 92.31% एवढी झाली आहे. यामधून शिक्षणशास्त्र पदवीचा अभ्यास करत शिक्षक बनण्याविषयी विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसून येतो.

हे वाचा

ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य CET (सामाईक प्रवेश परीक्षा) कक्षामार्फत जून ते नोव्हेंबर 2024 दरम्यान पार पडली. CAP म्हणजेच Centralized Admission Process द्वारे तीन फेऱ्या आणि त्यानंतर संस्थात्मक फेरी अशा चार टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. एकूण 34,170 जागा CAP अंतर्गत उपलब्ध होत्या, त्यापैकी 32,643 जागांवर प्रवेश झाला म्हणजेच 95.53% प्रवेश नोंदवला गेला.

या वर्षीचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बी.एड. अभ्यासक्रमात विद्यार्थिनींचे प्राधान्य कायम राहणे. 24,756 मुलींनी प्रवेश घेतला असून हा आकडा मागील वर्षांपेक्षा अधिक आहे. मुलींच्या सहभागात सातत्याने वाढ होत असल्याने शिक्षण व्यवसायात महिला अधिक पुढे येताना दिसत आहेत.

हे वाचा

मागील तीन वर्षांत जागा तसेच प्रवेश टक्केवारीतही सातत्याने वाढ झाली आहे. 2023-24 मध्ये 87.73%, 2024-25 मध्ये 90.57%, तर 2025-26 मध्ये सर्वाधिक 92.31% प्रवेश नोंदवले गेले. CET कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले की, ही प्रक्रिया सुरळीत पार पडली असून विद्यार्थी शिक्षक व्यवसायाला करिअर म्हणून अधिक प्राधान्य देत आहेत.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..