मित्रांनो कॉमन ॲडमिशन टेस्ट (CAT) 2025 ही देशातील सर्वात प्रतिष्ठित व्यवस्थापन प्रवेश परीक्षा आहे, जी भारतीय व्यवस्थापन संस्था (IIMs) आयोजित करतात. यंदा CAT 2025 परीक्षा 30 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार असून, ती देशातील सुमारे 170 शहरांमध्ये पार पडेल. या परीक्षेद्वारे उमेदवारांना भारतातील IIMs तसेच इतर प्रमुख बिझनेस स्कूल्समध्ये प्रवेश मिळतो.

CAT 2025 साठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी किमान 50% गुणांसह पदवी पूर्ण केलेली असावी, तर आरक्षित प्रवर्गासाठी (SC, ST, PwD) 5% सूट आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. ही परीक्षा तीन सत्रांमध्ये होण्याची शक्यता आहे. forenoon, afternoon आणि evening.

हे वाचा

CAT 2025 चा निकाल जानेवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल. उमेदवारांचा स्कोअर 31 डिसेंबर 2026 पर्यंत वैध राहणार आहे. या स्कोअरच्या आधारे IIMs व्यतिरिक्त अनेक खाजगी व्यवस्थापन संस्था तसेच काही नामांकित कंपन्याही उमेदवारांची निवड करतात.

प्रत्येक IIM संस्था स्वतःची कट-ऑफ आणि प्रवेश प्रक्रिया ठरवते. उमेदवारांची निवड CAT स्कोअर, ग्रुप डिस्कशन (GD), पर्सनल इंटरव्ह्यू (PI) आणि अकॅडमिक रेकॉर्ड यांच्या आधारे केली जाते.

CAT 2025 साठीचे Admit Card लवकरच प्रसिद्ध केले जातील आणि परीक्षा केंद्रांची यादी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. अर्ज करताना दिलेली माहिती अचूक असणे अत्यावश्यक आहे; अन्यथा उमेदवाराला परीक्षेतून अपात्र ठरवले जाऊ शकते. अधिकृत माहिती, Admit Card लिंक आणि निकालासाठी उमेदवारांनी https://iimcat.ac.in ही वेबसाइट नियमित तपासावी.

हे वाचा