सीबीएसई (CBSE) बोर्डाने 10वी आणि 12वीच्या 2025 मधील वार्षिक परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती List of Candidates (LOC) या स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. जर ही तारीख चुकली, तर नंतर अर्ज स्वीकारले जातील, पण त्यासाठी विलंब शुल्क (Late Fee) भरावा लागेल.
विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी (CWSN) स्वतंत्र सुविधा उपलब्ध आहे. त्यांना विनाशुल्क अर्ज करण्यासाठी 9 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2025 पर्यंत वेळ दिली आहे. तर विलंब शुल्कासह नोंदणीची मुदत 3 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर 2025 आहे.
खाजगी उमेदवारांसाठी नोंदणी कालावधी 9 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 ठेवण्यात आला आहे. जर त्यांनी वेळेत अर्ज केला नाही, तर ते 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2025 या दरम्यान विलंब शुल्कासह नोंदणी करू शकतील. नोंदणी करताना विषय, वैयक्तिक तपशील व श्रेणी नीट तपासून भरावी लागेल. कारण अर्ज एकदा सादर केल्यानंतर त्यात बदल करण्याची परवानगी मिळणार नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थी व शाळांनी वेळेत आणि अचूक माहिती भरून नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे.
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..






