CBSE बोर्डाने 2026 पासून लागू होणाऱ्या दहावीच्या परीक्षांसाठी नवीन मार्किंग स्कीम आणि परीक्षाविषयक बदल जाहीर केले आहेत. नवीन नियमांनुसार प्रत्येक विषयाचे 100 गुण आता अधिक स्पष्ट आणि संरचीत पद्धतीने विभाजित केले जाणार आहेत. या 100 गुणांमध्ये थिअरी, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट आणि इंटरनल असेसमेंट (IA) यांचे निश्चित प्रमाण ठरवण्यात आले आहे. काही विषयांत थिअरीला 80 गुण आणि IA/प्रॅक्टिकलला 20 गुण, तर काही विषयांत प्रकल्प आणि Viva याचा वाटा अधिक असेल.

CBSE ने शाळांना कडक सूचना देत सांगितले आहे की प्रॅक्टिकल किंवा IA चे गुण अपलोड करताना कोणतीही चूक झाल्यास नंतर ती दुरुस्त केली जाणार नाही. मागील वर्षांत शाळांनी केलेल्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने बोर्डाने हा कठोर निर्णय घेतला आहे.

हे वाचा

विशेष म्हणजे, 2026 पासून विद्यार्थ्यांना दोन वेळा बोर्ड परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. पहिली परीक्षा मुख्य असेल तर दुसरी इम्प्रूव्हमेंटसाठी. यामुळे विद्यार्थ्यांवरील दबाव कमी होऊन त्यांना अधिक चांगलं प्रदर्शन करता येईल.

नव्या बदलांमध्ये प्रॅक्टिकल, नकाशे, मॉडेल्स, लॅब अ‍ॅक्टिव्हिटी, Viva अशा कौशल्याधारित घटकांना अधिक महत्त्व दिले आहे. Competency-based प्रश्न, केस-स्टडी, MCQ यांचे प्रमाणही वाढवले गेले आहे.

CBSE ने 2025-26 साठीचा नवीन अभ्यासक्रम, नमुना प्रश्नपत्रिका आणि मार्किंग स्कीमही जाहीर केली आहे. हे सर्व बदल विद्यार्थ्यांच्या समज, practically skills आणि विश्लेषणक्षमता वाढवण्यासाठी करण्यात आले असून, 2026 ची परीक्षा अधिक पारदर्शक आणि कौशल्याधारित होणार आहे.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..