मित्रांनो कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट (CLAT 2026) साठी रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. जे विद्यार्थी पाच वर्षांच्या इंटीग्रेटेड लॉ प्रोग्राम (LLB) किंवा पोस्टग्रॅज्युएट (LLM) लॉ कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा विचार करत आहेत पण अद्याप अर्ज केला नाही, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. विद्यार्थी आता 07 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

CLAT 2026 परीक्षा दिनांक

CLAT 2026 परीक्षा 07 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच सत्रात होणार असून वेळ दुपारी 2 ते सायं. 4 अशी असेल. देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आयोजित केली जाईल.

हे वाचा

पात्रता अट

UG (5 वर्षांचा LLB) कोर्ससाठी अर्ज करणाऱ्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी किमान 55% मार्क्स अनिवार्य आहेत. तर PG (LLM) कोर्ससाठी अर्ज करणाऱ्यांकडे LLB पदवी असणे आवश्यक आहे, तसेच या स्तरासाठीही किमान 55% गुण आवश्यक असतात.

अर्ज कसा करावा?

  • CLAT 2026 साठी नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी consortiumofnlus.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. होमपेजवर दिसणाऱ्या “CLAT 2026 Registration” लिंकवर क्लिक करून नाव, ईमेल, मोबाइल नंबर यासह वैयक्तिक माहिती भरावी.
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फीस भरावी.
  • सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा आणि भविष्यासाठी प्रिंट-आउट घ्या.

ॲप्लिकेशन फी

CLAT अर्जासाठी सामान्य, OBC आणि NRI विद्यार्थ्यांसाठी फी 4000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर SC, ST आणि दिव्यांग (PWD) उमेदवारांसाठी फी 3500 रुपये आहे. फीस ऑनलाइन मोडमध्ये भरावी लागते आणि पेमेंट झाल्यानंतर ती परत मिळत नाही.

हे वाचा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..