मित्रांनो कॉमन लॉ Admission Test (CLAT) 2026 साठी नेशनल लॉ युनिव्हर्सिटीज (NLUs) लवकरच प्रवेशपत्र जारी करणार आहेत. देशभरातील नामांकित लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी CLAT परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रवेशपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. जरी अधिकृतरीत्या कोणतीही सूचना अद्याप दिलेली नसली, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार CLAT Admit Card 2026 कुठल्याही क्षणी जारी होऊ शकते.

हे वाचा

अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करण्यासाठी सज्ज राहा

ज्यांनी CLAT 2026 परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, त्यांनी अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ॲडमिट कार्ड उपलब्ध झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्डच्या मदतीने लॉगिन करून ते सहजपणे डाउनलोड करता येईल. कोणतीही त्रुटी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेल्या ॲडमिट कार्डवरील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी.

ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

  • ॲडमिट कार्ड डाउनलोड करणे अगदी सोपे आहे.
  • यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जाऊन “CLAT Admit Card 2026” या लिंकवर क्लिक करावे. पुढे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड भरून लॉगिन करावे.
  • यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ज्याचा डाउनलोड पर्याय उपलब्ध असेल.
  • विद्यार्थी ॲडमिट कार्डचा प्रिंट घेऊन परीक्षेच्या दिवशी सोबत ठेवू शकतात.
हे वाचा

CLAT 2026 परीक्षा कधी आणि कशी होणार?

माहितीतपशील
परीक्षेची तारीख07 डिसेंबर 2026
परीक्षेची वेळदुपारी 2:00 ते सायं. 4:00
परीक्षेची पद्धतऑफलाइन (OMR आधारित)
एकूण प्रश्न120 प्रश्न
एकूण गुण120 गुण
नेगेटिव्ह मार्किंगचुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा
विषयइंग्रजी • चालू घडामोडी • सामान्य ज्ञान • लॉजिकल रीझनिंग • Legal Reasoning

वेबसाइट वेळोवेळी तपासा

CLAT परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांना सल्ला दिला जातो की प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहा. ॲडमिट कार्ड न मिळाल्यास किंवा लॉगिनमध्ये त्रुटी आल्यास त्वरित हेल्पलाइनशी संपर्क साधावा.

हे वाचा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..