मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार राज्यात तब्बल 18,608 शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. अनेक ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने शिक्षकांची कमतरता जाणवत होती. ही समस्या दूर करण्यासाठी सरकारने कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला उच्च न्यायालयाचीही मान्यता मिळालेली आहे.

हे वाचा

राज्यात जिल्हा परिषदेकडे एकूण 64,000 शाळा आहेत. त्यापैकी 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या 18,106 शाळांमध्ये एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. तसेच 10 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या 8,089 शाळांमध्ये एक नियमित शिक्षक आणि एक कंत्राटी शिक्षक अशी नियुक्ती करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे आणि शिक्षणाचा स्तर उंचावण्यास पाठबळ मिळेल.

माध्यमिक स्तरावरही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नववी आणि 10वी वर्गात 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांचे समायोजन केले जाईल. तर 5वी ते 8वी वर्गांसाठी अतिरिक्त नियमित शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. मात्र कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती फक्त नववी आणि 10वी वर्गासाठीच केली जाईल.

हे वाचा

भरती प्रक्रियेची आणि शिक्षक समायोजनाची अंतिम मुदत 5 डिसेंबर 2025 अशी जाहीर करण्यात आली आहे. या काळात सुमारे 3000 शिक्षकांचे समायोजन आधीच केले जाणार आहे. या मेगा भरतीमुळे अनेक बेरोजगार शिक्षकांना रोजगाराची संधी मिळणार असून शिक्षण क्षेत्रात चांगली करिअर घडवण्यासाठी ही उत्तम संधी ठरणार आहे.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.