मित्रांनो ऐन दिवाळीला शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने शिक्षण सेवा गट-अ मधील अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक आणि समकक्ष पदावर तात्पुरती पदोन्नती देत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या निर्णयामुळे शिक्षण विभागात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निर्णयानुसार, शिक्षण अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना सुधारित वेतन संरचनेत पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र, ही पदोन्नती तात्पुरती स्वरूपाची असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना नियमितपणाचा किंवा सेवाजेष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नाही, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. तरीही, या पदोन्नतीमुळे अधिकाऱ्यांना उच्च जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाल्याने विभागात कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हे वाचा

शासनाने प्रसिद्ध केलेल्या या यादीत 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरचे कैलास दातखीळ यांना विभागीय शिक्षण उपसंचालक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. पुण्यातील दीपक माळी यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात सचिवपद मिळालं आहे. तेजराव काळे आणि स्मिता गौड यांना शिक्षण आयुक्तालयात उपसंचालक म्हणून नेमणूक देण्यात आली आहे.

तसेच, पुण्यातील पुष्पावती पाटील आणि सुचिता रोडगे (पाटेकर) यांनाही उपसंचालक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. भावना राजनोर यांना शालेय शिक्षण विभाग, मुंबई येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे, तर प्रिया शिंदे यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत उपआयुक्त पद देण्यात आले आहे. प्रभावती कोळेकर यांना कोल्हापूरमध्ये आणि एकनाथ अंबोकर यांना पुण्यात शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

ही तात्पुरती पदोन्नती असली तरी शिक्षण क्षेत्रातील प्रशासनिक नेतृत्वाला नवी दिशा देणारी ठरेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..