आईआयटी गुवाहाटीकडून GATE 2026 (Graduate Aptitude Test in Engineering) साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया लवकरच बंद केली जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्वरित अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. GATE 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2025 आहे. ही परीक्षा पूर्णपणे कंप्युटरवर आधारित (Computer Based Test) घेतली जाईल आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत IISc बेंगळुरू आणि विविध IITs कडून आयोजित केली जाते.
GATE 2026 Registration: अर्ज कसा करावा आणि परीक्षा पॅटर्न जाणून घ्या
GATE 2026 महत्वाच्या तारखा
GATE 2026 साठी अर्ज प्रक्रिया 28 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली आहे. सर्व अर्जदारांनी आपले अर्ज 28 सप्टेंबर 2025 पर्यंत सबमिट करणे आवश्यक आहे. त्यानंतर एक्सटेंडेड विंडो 29 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत उघडी राहील. परीक्षा 7, 8, 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी घेतली जाईल. त्यामुळे तयारीसाठी आणि अर्ज करण्यासाठी वेळ व्यवस्थित नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे.
GATE 2026 अर्ज शुल्क काय आहे?
GATE 2026 साठी उमेदवारांचे वर्गानुसार शुल्क ठरले आहे. महिला, SC, ST आणि PwD उमेदवारांसाठी 28 ऑगस्ट ते 28 सप्टेंबर 2025 पर्यंत प्रत्येक पेपरसाठी 1000 रुपये, तर 29 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2025 दरम्यान 1500 रुपये शुल्क आहे. इतर सर्व उमेदवारांसाठी (फॉरेन नेशनल समावेश) 28 ऑगस्ट ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान 2000 रुपये, तर 29 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2025 दरम्यान 2500 रुपये शुल्क लागू आहे.
GATE 2026 परीक्षा पॅटर्न काय आहे?
GATE 2026 परीक्षा 3 तासांची असेल. परीक्षा दोन भागात विभागली आहे: जनरल एप्टिट्यूड (15 अंक) आणि उमेदवाराने निवडलेल्या विषयाचा पेपर (85 अंक). प्रश्न MCQ (Multiple Choice Questions), MSQ (Multiple Select Questions) आणि NAT (Numerical Answer Type) प्रकारात येतील. MCQ च्या चुकीच्या उत्तरावर नेगेटिव्ह मार्किंग लागू होईल, जसे की 1 अंकाच्या प्रश्नावर 1/3 अंक कमी आणि 2 अंकाच्या प्रश्नावर 2/3 अंक कमी. MSQ आणि NAT च्या चुकीच्या उत्तरावर नेगेटिव्ह मार्किंग नाही. परीक्षा फक्त इंग्रजी माध्यमात होईल.
GATE 2026 अर्ज कसा करावा?
- अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट वर जा.
- होमपेजवर GATE 2026 Registration लिंकवर क्लिक करा.
- लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- त्यानंतर अर्ज शुल्क जमा करा.
- सबमिट केल्यानंतर Confirmation Page डाउनलोड करा आणि भविष्यासाठी प्रिंटआउट काढा.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..






