NEET PG 2025 परीक्षा 3 ऑगस्ट रोजी पार पडली आणि त्याचा निकाल 19 ऑगस्ट रोजी जाहीर झाला. यानंतर 27 ऑगस्टला मेरिट लिस्ट आणि 30 ऑगस्टला स्कोअरकार्ड प्रसिद्ध झाले. आता विद्यार्थी काउंसिलिंग शेड्यूलची वाट पाहत आहेत. लवकरच मेडिकल काउंसिलिंग कमिटी (MCC) कडून शेड्यूल जाहीर होणार असून नोंदणी प्रक्रिया mcc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर सुरू होईल.
NEET PG Counselling 2025: नोंदणी, प्रक्रिया, कट-ऑफ आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती
कागदपत्रांची तयारी
काउंसिलिंगमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आवश्यक कागदपत्र असणे अत्यंत गरजेचे आहे. अलॉटमेंट लेटर, NEET PG ॲडमिट कार्ड, निकाल/रँक लेटर, एमबीबीएस/बीडीएस डिग्री प्रमाणपत्र, इंटर्नशिप पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, जन्मतारीख पुरावा आणि जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) ही महत्त्वाची कागदपत्रे आधीपासून तयार ठेवणे आवश्यक आहे.
काउंसिलिंग प्रक्रिया कशी असेल?
काउंसिलिंग प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन होईल. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल. त्यानंतर चॉईस फिलिंग व लॉकिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. उपलब्ध जागांनुसार सीट अलॉटमेंट केले जाईल. ज्यांना सीट मिळेल त्यांनी दिलेल्या तारखेत संबंधित संस्थेत जाऊन अॅडमिशन घ्यावे लागेल.
कट-ऑफ (NEET PG 2025)
या काउंसिलिंगमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ठराविक कट-ऑफ पूर्ण करावा लागेल. जनरल/EWS विद्यार्थ्यांसाठी 50 पर्सेंटाइल व 276 गुण, जनरल PwBD विद्यार्थ्यांसाठी 45 पर्सेंटाइल व 255 गुण, तर SC/ST/OBC विद्यार्थ्यांसाठी 40 पर्सेंटाइल व 235 गुणांची अट ठेवण्यात आली आहे.
कोणत्या कोर्समध्ये प्रवेश मिळेल?
NEET PG काउंसिलिंगद्वारे विद्यार्थ्यांना विविध पोस्टग्रॅज्युएट कोर्समध्ये प्रवेश मिळतो. यात एमडी (MD), एमएस (MS), पीजी डिप्लोमा, पोस्ट-MBBS DNB प्रोग्राम तसेच NBEMS डिप्लोमा कोर्सेसचा समावेश आहे.
अधिक माहिती कुठे मिळेल?
विद्यार्थ्यांनी अधिकृत माहिती, काउंसिलिंग शेड्यूल आणि नोंदणीसाठी mcc.nic.in या वेबसाइटवर नियमितपणे भेट द्यावी. सर्व अद्ययावत माहिती याच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..






