इंटेलिजन्स ब्युरो (IB) सिक्युरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव भरती परीक्षा 2025 च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. गृह मंत्रालयाने (MHA) दिलेल्या माहितीनुसार टियर-1 परीक्षा 29 आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता परीक्षार्थी या परीक्षेची आतुरतेने वाट पाहत होते.
अर्ज प्रक्रिया आणि अधिसूचना
या भरतीसंदर्भातील अधिकृत अधिसूचना 25 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर 26 जुलै 2025 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती आणि 17 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी उमेदवारांना मिळाली. शुल्क भरण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2025 होती.
ॲडमिट कार्ड
उमेदवारांना परीक्षेचे ॲडमिट कार्ड परीक्षा तारखेच्या 7 ते 10 दिवस आधी म्हणजेच सप्टेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मिळतील. ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना mha.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करावे लागेल.
परीक्षा केंद्र व शिफ्ट
ॲडमिट कार्डवर उमेदवारांचा परीक्षा केंद्राचा पत्ता, शिफ्ट (सकाळ/दुपार) आणि रिपोर्टिंग टाइम नमूद असेल. महत्वाचे म्हणजे ठरवलेल्या रिपोर्टिंग टाइमनंतर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी वेळेपूर्वी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
पुढील टप्पे
टियर-1 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना पुढे टियर-2 आणि टियर-3 परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासंबंधीची माहिती ईमेलद्वारे तसेच अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल. या टप्प्यांनंतर अंतिम निवड केली जाणार आहे.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
| सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | येथे क्लिक करा |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..






