मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने भूमिअभिलेख विभागातील 905 रिक्त पदांसाठी तत्त्वतः मान्यता दिली आहे. ही भरती भूकरमापक (Surveyor), लघुलेखक (उच्च व निम्न श्रेणी) यांसारख्या पदांसाठी होणार आहे. मागील काही वर्षांत अनेक भूकरमापकांनी राजीनामा दिल्यामुळे मोजणीचे काम ठप्प झाले होते, त्यामुळे या भरतीला विशेष महत्त्व आहे.

हे वाचा

भरती पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या महसुली विभागात होणार आहे. या भरतीमुळे जमीन मोजणीच्या प्रकरणांना गती मिळेल व विभागाच्या कामकाजात सुधारणा होईल. या भरतीत लघुलेखक (उच्चश्रेणी) 2 पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) 9 पदे, भूकरमापक मुंबई 259, नाशिक 124, छ. संभाजीनगर 210, अमरावती 117, नागपूर 112 पदांसह एकूण 905 पदांची भरती होणार आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी राज्यात 1200 भूकरमापकांची भरती झाली होती. मात्र विविध कारणांमुळे सुमारे 700 जणांनी नोकरी सोडल्यामुळे अनेक मोजण्या प्रलंबित राहिल्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन भूमिअभिलेख विभागाने राज्य सरकारकडे नवीन भरतीसाठी प्रस्ताव पाठवला आणि त्यास मंजुरी मिळाली.

हे वाचा

सध्या ही भरती तत्त्वतः मान्य आहे; अधिकृत अधिसूचना येताच अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया याबाबत तपशील जाहीर केला जाईल. ही भरती महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नोकरीत स्थिर भविष्य मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी तयारी लवकर सुरू करणे महत्त्वाचे आहे, कारण अधिसूचना जाहीर होताच अर्ज सुरू होतील.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिकायेथे क्लिक करा

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..