मित्रांनो केंद्र सरकार लवकरच JEE Main (इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा) आणि NEET UG (मेडिकल प्रवेश परीक्षा) या दोन्ही महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांच्या कठीणतेच्या स्तराची (Difficulty Level) समीक्षा करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारची योजना अशी आहे की या परीक्षा थेट १२वीच्या सिलेबसच्या कठीणतेशी सुसंगत असाव्यात. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कोचिंग क्लासेसवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

आजच्या घडीला विद्यार्थी शालेय शिक्षणापेक्षा प्रवेश परीक्षांच्या तयारीवर अधिक लक्ष देतात. यामुळे अनेकांना महागड्या कोचिंग क्लासेसचा आधार घ्यावा लागतो. पालकांचा आणि शिक्षकांचा असा आरोप आहे की, शालेय अभ्यासक्रम आणि प्रवेश परीक्षांच्या डिफिकल्टी लेवलमध्ये मोठा फरक असल्याने विद्यार्थी कोचिंगला जाण्यास भाग पाडले जातात.

हे वाचा

या समस्येवर उपाय शोधण्यासाठी सरकारने नऊ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे नेतृत्व उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी करत आहेत. समितीत CBSE चे अध्यक्ष, शिक्षण मंत्रालयातील अधिकारी, IIT मद्रास, IIT कानपूर, NIT त्रिची, NCERT चे प्रतिनिधी तसेच केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि खासगी शाळांचे प्राचार्य यांचा समावेश आहे.

समितीचा उद्देश फक्त सिलेबसचे पुनरावलोकन करणे नसून, कोचिंग संस्था, डमी शाळा आणि शिक्षण पद्धतीतील त्रुटींचा अभ्यास करून सुधारणा सुचवणे हा देखील आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर असलेला ताण कमी होईल, त्यांची क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल विवेकबुद्धी आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढेल.

हा निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे, कारण तो शालेय अभ्यासक्रम आणि प्रवेश परीक्षा यामधील गॅप कमी करेल. पुढील काळात, JEE Main आणि NEET या परीक्षा १२वीच्या सिलेबसशी थेट जोडल्या गेल्यास विद्यार्थ्यांचा कोचिंगवरील अवलंबित्व निश्चितच कमी होऊ शकेल.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..