मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समिती या शिक्षण संस्थेवर बनावट कागदपत्रे तयार करून शासन, विद्यार्थी आणि प्रशासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या संस्थेविरुद्ध माजी कर्मचारी देविदास नारायण बढे यांनी तक्रार दाखल केली असून त्यांनी सांगितले की, “मी संस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून काम करत होतो. पण संस्थेच्या गैरप्रकारांचा पर्दाफाश होऊ नये म्हणून माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.”
बढे यांनी आरोप केला आहे की संस्थेच्या नावावर ३०० खाटांचे ‘कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समिती चॅरिटी हॉस्पिटल’ नोंदवले गेले आहे, मात्र प्रत्यक्षात असे हॉस्पिटल अस्तित्वातच नाही. डॉक्टर, नर्स, उपकरणे किंवा रुग्णसेवा यापैकी काहीही उपलब्ध नाही. या खोट्या नोंदींवर शासनाची दिशाभूल करून निधी आणि मंजुरी मिळवण्यात आली आहे.
तसेच, संस्थेच्या नावावर चालवली जाणारी नर्सिंग, डी.एड. आणि लॉ कॉलेजेस ही फक्त आठ खोल्यांत चालवली जात असून, मंजुरीसाठी दाखवलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले आहे. नॅक मूल्यांकनासाठी सादर केलेल्या SSR रिपोर्टमध्येही खोटी माहिती देण्यात आली आहे. न्यायाधीश पदावरील व्यक्तीला शिक्षक म्हणून दाखवणे, स्वमालकी दाखवलेल्या इमारतीसाठी दर महिन्याला ९० हजार रुपये भाडे दाखवणे अशा गंभीर गैरप्रकारांचा भंडाफोड झाला आहे.
देविदास बढे यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, “या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई व्हावी.” या घटनेमुळे कोपरगावातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात संतापाचे वातावरण पसरले असून, लोकांनी प्रशासनाने या प्रकाराची पारदर्शक चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..





