मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2025) येत्या 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. यंदा परीक्षार्थ्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली असून एकूण 4,75,668 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 3,30,074 इतकी होती, म्हणजेच यंदा सुमारे 1.45 लाखांची वाढ झाली आहे.

ही वाढ मुख्यतः सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयामुळे झाली आहे. या निर्णयानुसार, कार्यरत शिक्षकांनाही TET परीक्षा देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे D.Ed आणि B.Ed धारकांसह विद्यमान शिक्षकांनीही मोठ्या संख्येने अर्ज केले आहेत. ही परीक्षा शिक्षक पदांसाठी पात्रता तसेच पदोन्नती मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरते.

हे वाचा

MAHATET परीक्षा दोन स्तरांवर घेतली जाते. Paper 1 (प्राथमिक स्तर: वर्ग 1 ते 5) आणि Paper 2 (माध्यमिक स्तर: वर्ग 6 ते 8). दोन्ही पेपरमध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQs) असतात आणि नकारात्मक गुण प्रणाली नाही.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या परीक्षेसाठी 24,385 परीक्षार्थी सहभागी होणार असून परीक्षा 37 केंद्रांवर दोन सत्रांत होईल. प्रशासनाने सर्व सुविधा, सुरक्षा आणि व्यवस्था सुनिश्चित केली आहे.

दिवाळी सुट्टीचा फायदा घेत अनेक उमेदवारांनी ऑनलाइन तयारी व क्रॅश कोर्सेस सुरू केले आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही उत्साहाने तयारी करत असून, ही परीक्षा राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी चाचणी ठरणार आहे.

हे वाचा