महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता 2026 च्या बारावी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या मागणीचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी ही अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२५ होती, मात्र अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे वेळेत फॉर्म भरता आले नव्हते.
या मुदतवाढीनंतर विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अर्ज सादर करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. आता विलंबशुल्कासह अर्ज ३ नोव्हेंबरपर्यंत सादर करता येतील. नियमित आणि विलंबशुल्काने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ७ नोव्हेंबरपर्यंत मंडळाकडे जमा करता येईल, तर विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलिस्ट १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत विभागीय मंडळांकडे सादर करता येतील.
दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील अशीच मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या 10वीच्या परीक्षा अर्जांची अंतिम तारीख २७ ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि अर्ज प्रक्रियेत अडचणी येत असल्यामुळे ही तारीखही पुढे ढकलली जाऊ शकते.
या प्रक्रियेत सहभागी होणारे विद्यार्थी म्हणजे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजना अंतर्गत येणारे तसेच व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी. सर्व अर्ज कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना U-DISE आणि PEN ID वापरून लॉगिन करावे लागणार आहे.
खासगी विद्यार्थ्यांसाठी (Form No.17) देखील राज्य मंडळाने सवलत दिली आहे. आता हे अर्ज ३१ ऑक्टोबरपर्यंत विलंबशुल्कासह सादर करता येतील. ही संधी अशा विद्यार्थ्यांसाठी शेवटची आहे, जे नियमित शाळांमधून प्रविष्ट होत नाहीत.
बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान घेतली जाणार आहे, तर प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होतील. दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च, आणि प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीदरम्यान पार पडतील.
राज्य मंडळाने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोयीचा आणि सकारात्मक आहे. वेळेत फॉर्म भरता न आल्याने अनेक विद्यार्थी चिंतेत होते, परंतु या मुदतवाढीमुळे त्यांना आता शेवटची संधी मिळाली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी आणि आगामी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी सज्ज व्हावे.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..






