मित्रांनो महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाने MBBS आणि BDS अभ्यासक्रमांच्या तिसऱ्या फेरीला सुरुवात केली आहे. पहिल्या दोन फेर्यांनंतरही अनेक जागा रिक्त राहिल्यामुळे आता विद्यार्थ्यांना पुन्हा एक सुवर्णसंधी मिळाली आहे. राज्यातील ६३६ MBBS आणि ८९१ BDS जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी ही संधी गमावू नये, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

सीईटी कक्षाच्या नव्या वेळापत्रकानुसार, उमेदवारांना ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्राथमिक नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करण्याची संधी देण्यात आली आहे. नोंदणीनंतर ९ ऑक्टोबर रोजी तात्पुरती गुणानुक्रम यादी (Merit List) आणि सीट मॅट्रिक्स प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांना १० ते १२ ऑक्टोबर या कालावधीत प्राधान्यक्रम (Preference Form) भरता येईल. त्यानंतर १५ ऑक्टोबरला तिसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी १६ ते २० ऑक्टोबर (सायं. ५.३० वाजेपर्यंत) महाविद्यालयात हजर राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

हे वाचा

राज्यात सध्या खासगी महाविद्यालयांत MBBS च्या ४६८ आणि सरकारी महाविद्यालयांत १६८ जागा उपलब्ध आहेत. तर BDS साठी खासगी संस्थांमध्ये ८३८ आणि सरकारी महाविद्यालयांत ५३ जागा रिक्त आहेत. दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाकडे तुलनेने कमी कल असला तरी, अंतिम फेरीत बहुतेक जागा भरल्या जातात. तसेच, एनआरआय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र नोंदणी पोर्टलवर ७ ऑक्टोबरपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेशाशी संबंधित सर्व अद्ययावत माहिती, याद्या आणि सूचना जाणून घेण्यासाठी www.mahacet.org या संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी. तिसऱ्या फेरीत जागा मिळाल्यानंतर प्रवेश घेणे बंधनकारक असून, अन्यथा पुढील फेऱ्यांसाठी पात्रता रद्द होईल.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..