मित्रांनो रेल्वे संरक्षण दल (RPF) कॉन्स्टेबल भरती 2025 साठी शारीरिक चाचणी (PET/PMT) घेण्यासाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना आता फिजिकल टेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी अधिकृत प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करता येईल. हे प्रवेशपत्र रेल्वे भरती मंडळाच्या (RRB) अधिकृत संकेतस्थळावर www.rrbcdg.gov.in किंवा थेट rrb.digialm.com वर उपलब्ध आहे. उमेदवारांनी ते डाउनलोड करून त्याची प्रिंट घेणे अनिवार्य आहे, कारण प्रवेशपत्राशिवाय केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.

हे वाचा

RPF Constable Admit Card 2025: फिजिकल परीक्षेचे प्रवेशपत्र जारी

RPF Constable PET/PMT परीक्षा वेळापत्रक

रेल्वे भरती बोर्डाने जाहीर केलेल्या अधिकृत शेड्यूलनुसार RPF Constable फिजिकल परीक्षा 13 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025 या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर पार पडणार आहे. प्रत्येक उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्र, तारीख आणि रिपोर्टिंग वेळ याबाबत सविस्तर माहिती दिलेली असेल. उमेदवारांनी वेळेआधी केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे, कारण उशीर झाल्यास प्रवेश दिला जाणार नाही.

शारीरिक मापन चाचणी (PMT)

शारीरिक मापन चाचणीत उमेदवारांची उंची आणि छातीचे माप तपासले जाईल.

  • पुरुष उमेदवार (UR/EWS/OBC): किमान उंची 165 सेमी
  • महिला उमेदवार (UR/EWS/OBC): किमान उंची 157 सेमी
  • SC/ST पुरुष: 160 सेमी
  • SC/ST महिला: 152 सेमी

तसेच पुरुष उमेदवारांची छाती 80 सेमी (फुगविल्यावर 85 सेमी) असणे आवश्यक आहे. या मापांखालील उमेदवारांना अपात्र ठरवले जाईल.

शारीरिक दक्षता चाचणी (PET)

शारीरिक दक्षता चाचणी उमेदवारांची खरी क्षमता तपासणारा टप्पा आहे.

  • पुरुष उमेदवारांना: 1600 मीटर धाव 5 मिनिटे 45 सेकंदात पूर्ण करावी लागेल.
  • महिला उमेदवारांना: 800 मीटर धाव 3 मिनिटे 40 सेकंदात पूर्ण करावी लागेल.
  • याशिवाय उमेदवारांना लांब उडी आणि उंच उडी करावी लागेल. हे सर्व चाचण्या शारीरिक तंदुरुस्ती आणि स्टॅमिना यावर आधारित असतात, त्यामुळे योग्य सराव आणि तयारी महत्त्वाची आहे.

डॉक्युमेंट वेरिफिकेशन (DV) प्रक्रिया

PET आणि PMT पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची डॉक्युमेंट पडताळणी (Document Verification) केली जाईल. या टप्प्यात उमेदवारांनी त्यांचे सर्व मूळ प्रमाणपत्रे तसेच दोन संच छायाप्रती सोबत आणणे आवश्यक आहे. यात शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, जात प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांचा समावेश असेल. चुकीची किंवा अपूर्ण माहिती सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरवला जाईल.

हे वाचा

प्रवेशपत्र डाउनलोड प्रक्रिया काय आहे?

RPF Constable PET Admit Card डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी खालील पद्धतीचा अवलंब करावा.

  1. सर्वप्रथम RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या www.rrbcdg.gov.in.
  2. होमपेजवर उपलब्ध असलेल्या “Download E-Call Letter for RPF Constable PET/PMT/DV 2025” या लिंकवर क्लिक करा.
  3. त्यानंतर rrb.digialm.com या पोर्टलवर लॉगिन पेज उघडेल.
  4. तुमचा Registration Number आणि जन्मतारीख (Date of Birth) भरून लॉगिन करा.
  5. तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करून प्रिंट काढा.

RPF Constable Admit Card 2025

Admit Card linkclick here