मित्रांनो कर्मचारी निवड आयोगाने (SSC) उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता Junior Engineer (JE) आणि Sub-Inspector (SI) परीक्षा 2025 साठी उमेदवार स्वतःच्या सोयीप्रमाणे परीक्षेची तारीख, परीक्षा केंद्र असलेले शहर आणि शिफ्ट (Morning/Evening) निवडू शकतील. या सुविधेमुळे उमेदवारांना अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर परीक्षा प्रक्रिया अनुभवता येईल.
स्लॉट सिलेक्शन कधी सुरू होणार आहे?
| परीक्षेचे नाव | सुरुवात होण्याची तारीख | शेवटची तारीख | वेळ मर्यादा |
|---|---|---|---|
| Junior Engineer (JE) परीक्षा 2025 (Paper-I) | 10 नोव्हेंबर 2025 | 13 नोव्हेंबर 2025 | रात्री 11:00 वाजेपर्यंत |
| Sub-Inspector (Delhi Police आणि CAPFs) परीक्षा 2025 (Paper-I) | 17 नोव्हेंबर 2025 | 21 नोव्हेंबर 2025 | रात्री 11:00 वाजेपर्यंत |
टीप: ही सुविधा फक्त डिसेंबर 2025 मध्ये होणाऱ्या Paper-I परीक्षांसाठीच लागू आहे.
स्लॉट सिलेक्शन कसे करावे? (संपूर्ण प्रक्रिया)
स्लॉट निवडण्यासाठी उमेदवारांना SSC च्या अधिकृत वेबसाइटवर (ssc.gov.in) लॉगिन करावे लागेल.
- आपल्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड ने लॉगिन करा.
- “My Application” सेक्शनमध्ये जा.
- तिथे उपलब्ध “Slot Selection” पर्याय निवडा.
- अर्ज करताना निवडलेल्या तीन शहरांमधील उपलब्ध तारीख आणि शिफ्ट यांपैकी आपल्या सोयीचा स्लॉट निवडा.
- निवड पूर्ण केल्यानंतर OTP (One-Time Password) टाकून चेक करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचा स्लॉट निश्चित मानला जाईल.
एकदा निवड झाल्यावर बदल करता येणार नाही
SSC ने स्पष्ट सांगितले आहे की, उमेदवाराने एकदा स्लॉट निवडून त्याची पुष्टी (confirmation) केल्यानंतर तो निर्णय अंतिम मानला जाईल. त्यानंतर कोणत्याही कारणासाठी स्लॉट, शहर किंवा तारीख बदलण्याची संधी दिली जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी स्लॉट निवडताना आपली तयारी, प्रवासाची सोय आणि वेळ यांचा नीट विचार करावा.
जर उमेदवाराने स्लॉट निवडला नाही तर काय होईल?
जर एखाद्या उमेदवाराने दिलेल्या कालावधीत स्लॉट निवडला नाही, तर SSC स्वतःहून सिस्टमच्या माध्यमातून त्याला उपलब्ध असलेल्या सीट्सनुसार आणि अर्ज करताना दिलेल्या शहरांच्या प्राथमिकतेनुसार स्लॉट देईल.
हा स्लॉट अंतिम मानला जाईल आणि त्यात बदल करण्याची परवानगी उमेदवारांना दिली जाणार नाही.
भरती मोहिमेची माहिती
- या भरती मोहिमेद्वारे SSC चं उद्दिष्ट आहे.
- Junior Engineer (JE) साठी एकूण 1,731 पदे,
- आणि Sub-Inspector (Delhi Police आणि CAPFs) साठी 5,308 पदे भरावीत.
ही दोन्ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर होणार असल्याने लाखो उमेदवार यात सहभागी होणार आहेत.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..






