शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने असा ऐतिहासिक निर्णय दिला आहे की, नियुक्तीच्या वेळी TET प्रमाणपत्र नसले तरी शिक्षकांना सेवेतून काढता येणार नाही. या निर्णयामुळे हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण क्षेत्रातील पात्रता आणि भरती प्रक्रियेवर हा निर्णय मोठा परिणाम घडवणारा ठरणार आहे.

मित्रांनो या प्रकरणात कानपूर नगर येथील दोन सहाय्यक शिक्षकांची नियुक्ती 2012 साली झाली होती. मात्र त्या वेळी त्यांच्या कडे टीईटी प्रमाणपत्र नव्हते. नंतर त्यांनी 2014 मध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली होती, पण 2018 मध्ये त्यांना सेवेतून काढण्यात आले. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली होती, पण त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्याय दिला.

हे वाचा

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, RTE कायद्याच्या कलम 23 मध्ये 2017 मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती, ज्यामुळे शिक्षकांना पात्रता पूर्ण करण्याची मुदत 31 मार्च 2019 पर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे वाढीव मुदतीपूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या शिक्षकांना सेवेतून काढणे योग्य नाही, असे न्यायालयाने म्हटले.

न्यायालयाने दोन्ही शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले असून, त्यांना सर्व अनुषंगिक लाभ मिळणार आहेत, मात्र मागील वेतन मिळणार नाही. या निर्णयामुळे शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा निर्णय शिक्षकांसाठी न्यायाचा विजय आहे.

हा निकाल फक्त दोन शिक्षकांसाठी नव्हे, तर देशभरातील हजारो शिक्षकांसाठी दिलासादायक ठरला आहे, ज्यांना फक्त नियुक्तीच्या वेळी प्रमाणपत्र नसल्यामुळे सेवा गमवावी लागली होती. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय शिक्षण क्षेत्रात स्थैर्य, न्याय आणि पारदर्शकतेचा नवा आदर्श निर्माण करतो.

हे वाचा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..