Talathi Selection Process: तलाठी (Talathi) हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील एक अत्यंत महत्त्वाचे व प्रतिष्ठित पद आहे. जमीन नोंदणी, महसूल वसुली किंवा शेतकऱ्यांचे 7/12 असो सोबतच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी अश्या प्रमुख कामांची जबाबदारी तलाठ्यावर असते.

तलाठी पदासाठी कोण पात्र आहे? तलाठी होण्यासाठी कोणत्या परीक्षा द्यावी लागते? त्यासाठी अभ्यासक्रम काय असतो? आणि निवड प्रक्रिया कशी असते? या सर्वच टॉपिकस बद्दल संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये मिळणार आहेत.

तलाठी पदाबद्दल माहिती (Talathi Post Details)

महसूल विभागामार्फत होणाऱ्या तलाठी भारताकडे संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांचे विशेष लक्ष आहे. या पदाचे आता अधिकृत नाव “ग्राम महसूल अधिकारी” असे करण्यात आले पण तरीसुद्धा उमेदवार व सर्वसामान्यांमध्ये हे पद “तलाठी” म्हणूनच ओळखतात. तलाठी हे अत्यंत महत्त्वाचे पद असून, महसूल गोळा करणे, जमीनीची मोजणी, सात-बारा आणि नागरिक सेवा यासारखी महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते.

महाराष्ट्रात तलाठी या जागेसाठी अनेक जण तयारी करतात परंतु काहींना तलाठी भरतीसाठीची निवड कोणत्या निकषांच्या आधारे होते याचीच माहिती नसते. जर तुमचे स्वप्न तलाठी बनण्याची आहे किंवा तुम्ही तलाठी या पदासाठी तयारी करत आहात तर हि पोस्ट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक माहिती वाचा.

हे वाचा
पदाचे नावतलाठी (ग्राम महसूल अधिकारी)
विभागमहसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन
शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate)
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे (मागास प्रवर्गासाठी सवलत लागू)
निवड प्रक्रियाऑनलाइन CBT परीक्षा + डॉक्युमेंट पडताळणी
नोकरीचे स्थानसंपूर्ण महाराष्ट्र
पगार₹25,500 ते ₹81,100 (सेवाभत्त्यांसह)

तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी प्राप्त केलेली असावी. कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. सोबतच MS-CIT किंवा तत्सम संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे.

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कोणतीही पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली असेल तरी अर्ज करता येईल.
  • MS-CIT किंवा तत्सम संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे. (प्रमाणपत्र जॉइनिंग नंतर 2 वर्षाच्या आतमध्ये सदर करता येईल.)

Note: नवीन जाहिरातीत काही बदल होऊ शकतात, सध्या कोणतीही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही परंतु मागील भरतीच्या आधारे ही पात्रता निश्चित आहे.

वयोमर्यादा (Age Limit)

तलाठीपदासाठी उमेदवाराची वय हे किमान 18 वर्षे ते 38 वर्षे असणे गरजेचे आहे, वय तपशील काहीलप्रमाणे आहे

प्रवर्गवयोमर्यादा
सामान्य प्रवर्ग18 ते 38 वर्षे
इतर मागासवर्ग (OBC/SC/ST)18 ते 43 वर्षे पर्यंत सवलत (5 वर्षांची सूट)
दिव्यांग / माजी सैनिकशासन नियमांनुसार सवलत

Talathi Bharti Selection Process निवड प्रक्रिया

Talathi Selection Process: तलाठी पदासाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षेवर आधारित असते. या परीक्षेत सामान्य ज्ञान मराठी भाषा, संगणक ज्ञान आणि महाराष्ट्राच्या कायद्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. परीक्षा उत्तीर्ण झालेल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होते. या यादीमध्ये परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणानुसार रँक (Rank) असते. गुणवत्ता यादीच्या आधारे पात्र उमेदवारांची कागदपत्र तपासणी केली जाते. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते आणि नंतर पदभार ग्रहण करण्याची संधी मिळते.

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी निवड प्रक्रिया दोन टप्प्यात होते:महाराष्ट्र तलाठी परीक्षा पॅटर्न Talathi Selection Process:

StageDetails
1. लेखी परीक्षा (Written Exam CBT)100 प्रश्न, 200 गुणांचे लेखी ऑनलाइन परीक्षा.
2. कागदपत्र पडताळणी (Document Verification)लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाते. सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे निश्चित स्थळी सादर करावी लागतात.

महाराष्ट्र तलाठी लेखी परीक्षा पॅटर्न

ग्राम महसूल अधिकारी Exam Pattern Details:

  • परीक्षा पद्धत: ऑनलाइन (CBT) Objective बहुपर्यायी परीक्षा
  • प्रश्नसंख्या: 100
  • प्रत्येक प्रश्नाचे गुण: 2 गुण
  • नकारात्मक (Negative) गुणांकन: नियमाप्रमाणे
  • कालावधी: 120 मिनिटे (2 तास)
विषयप्रश्नांची संख्यागुण
मराठी भाषा2550
इंग्रजी भाषा2550
सामान्य ज्ञान2550
बुद्धिमत्ता चाचणी (IQ)2550
एकूण100200

Talathi Syllabus अभ्यासक्रम

भरती संपूर्ण अभ्यासक्रम Talathi Selection Process written exam Syllabus

मराठी Talathi Syllabus (25 प्रश्न – 50 गुण)

  • विरुद्धार्थी शब्द
  • समानार्थी शब्द
  • योग्य शब्दांची निवड
  • वाक्यरचना
  • वाक्यप्रकार
  • काळ (Tenses)
  • अलंकार, छंद, समास
  • म्हणी व वाक्प्रचार
  • वाक्यातील चुका ओळखणे
  • उपसर्ग व प्रत्यय
  • वाच्य
  • अव्यय, क्रियापदाचे प्रकार
  • संधी आणि विग्रह

इंग्रजी (25 प्रश्न – 50 गुण)

  • Grammar
  • Sentence Completion
  • Vocabulary
  • Synonyms / Antonyms
  • Comprehension

सामान्य ज्ञान (25 प्रश्न – 50 गुण)

  • चालू घडामोडी (महाराष्ट्र व भारत)
  • इतिहास व भूगोल (मुख्यतः महाराष्ट्र)
  • राज्यघटना, प्रशासन
  • आर्थिक व सामाजिक विकास

बुद्धिमत्ता चाचणी (25 प्रश्न – 50 गुण)

  • अंकगणितीय क्षमता
  • तर्कशक्ती
  • आकृती ओळख
  • क्रम लावणे
  • समस्या सोडवण्याची क्षमता

Documents लागणारे कागद पत्रे

तलाठी भरतीसाठी आवश्यक कागदपत्र, प्रमुख कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे: पदवी प्रमाणपत्र (ग्रॅज्युएशन डिग्री), MS-CIT
  • आधार कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • पत्ता पुरावा
  • फोटो: पासपोर्ट फोटो आवश्यक.

ग्रामसेवक परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके

परीक्षेच्या तयारी साठी काही पुस्तके, या परीक्षेमध्ये पाच वेगवेगळ्या विषयांचा समावेश असल्यामुळे प्रत्येक विषयासाठी खाली दिलेली बुकलिस्ट पुस्तके अनुभवी विद्यार्थी जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्या रेफेरेंस ने तयार करण्यात आलेली आहे.

विषयपुस्तक
मराठीलक्ष्मीकांत देशमुख, Balasaheb Shinde
इंग्रजीEnglish Grammar by Wren & Martin
सामान्य ज्ञानLucent’s GK, महाराष्ट्र सामान्य ज्ञान – मोरे प्रकाशन
बुद्धिमत्ताR.S. Aggarwal – Verbal & Non-Verbal Reasoning
हे वाचा

Talathi Bharti Last Cut Off 2023

तलाठी भरती 2023 ची परीक्षा राज्यभरात घेण्यात आली, लाखो उमेदवारांनी त्यात भाग घेतला होता. खाली दिलेले कट-ऑफ हा विविध प्रवर्गासाठी आहेत, परीक्षेच्या विश्लेषणावर आधारित आहेत.

Cut Off MarksCut Off Marks
General (सामान्य)172 – 180 गुण
OBC170 – 176 गुण
EWS168 – 176 गुण
SC160 – 168 गुण
ST150 – 162 गुण
VJ160 – 168 गुण
NT160 – 168 गुण

Note: वरील कट-ऑफ हे तलाठी भरती 2023 चे असून ते जिल्हानिहाय वेगवेगळे असू शकतात.

महाराष्ट्र तलाठी पगार (Talathi Salary)

तलाठी पदासाठी देण्यात येणारा वेतनश्रेणी खालीलप्रमाणे आहे:

पदाचे नाववेतनश्रेणी (Pay Level S-6)
तलाठी₹25,500 – ₹81,100/- (महसूल व वन विभाग)

यामध्ये महागाई भत्ता (DA), HRA, इतर शासन मान्य भत्तेही समाविष्ट असतात.

महसूल विभाग दरवर्षी तलाठी भरती आयोजित करत असतो. 2025 मध्ये तलाठी पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती अपेक्षित आहे. अधिकृत वेबसाईट : https://mahabhumi.gov.in

Talathi Selection Process: ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी पद जबाबदारीचे पद आहे. जर तुम्हाला महसूल आणि प्रशासनात नोकरीची आवडअसेल, तर तलाठी ही एक उत्तम संधी आहे.

तलाठी भरतीसंबंधी कुठलाही प्रश्न असल्यास खाली कॉमेंट करा.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..