मित्रांनो आजच्या काळात शिक्षण फक्त स्वप्न राहिलं नाही. ते पूर्ण करण्याची ताकद योग्य स्कॉलरशिप देऊ शकते. भारतातील हजारो हुशार मुली आणि विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे त्यांचं करिअर थांबवावं लागू नये म्हणून देशातील प्रतिष्ठित संस्था पुढे आल्या आहेत. Mahindra, AICTE, Azim Premji Foundation आणि Reliance Foundation सारख्या टॉप संस्थांच्या स्कॉलरशिप योजना आज अनेक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याचं तिकीट देत आहेत. जर तुमच्यात जिद्द आहे, मेहनत करण्याची तयारी आहे आणि स्वप्न मोठं आहे… तर या स्कॉलरशिप तुमच्यासाठीच आहेत. पुढील माहिती तुम्हाला तुमची योग्य स्कॉलरशिप निवडायला नक्की मदत करेल.

Top 4 Scholarships for Girls 2026 — योग्य विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याचा मार्ग

Mahindra EmpowerHer Scholarship 2026

Mahindra EmpowerHer Scholarship ही मुलींसाठी खास शिष्यवृत्ती योजना आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील मुलींना उच्च शिक्षणासाठी मदत देणे हा मुख्य उद्देश आहे. Class 9 ते Graduation स्तरावरील मुली अर्ज करू शकतात. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 4 लाखांपेक्षा कमी असावे आणि मागील शैक्षणिक वर्षात किमान 50% गुण आवश्यक आहेत. SC, ST, OBC, EWS आणि PwD विद्यार्थिनींना प्राधान्य दिले जाते. निवड झालेल्या विद्यार्थिनींना 5,500 ची आर्थिक मदत मिळते. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. या scholership related संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

हे वाचा

AICTE Pragati Scholarship 2026

AICTE Pragati Scholarship ही भारत सरकारची मुलींसाठी तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन देणारी मोठी योजना आहे. Diploma किंवा Degree (Engineering/Technical) मध्ये प्रवेश घेतलेल्या मुली पात्र आहेत. एका कुटुंबातून जास्तीत जास्त दोन मुलींना फायदा मिळतो. वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख आहे. निवड झालेल्या मुलींना प्रति वर्ष 50,000 रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते, ज्यामध्ये फी, पुस्तके आणि अन्य शैक्षणिक खर्च समाविष्ट असतात. अर्ज National Scholarship Portal (NSP) वर करावा लागतो. या scholership related संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

हे वाचा

Azim Premji Foundation Scholarship 2026

Azim Premji Foundation Scholarship ही ग्रामीण आणि कमी संधी असलेल्या मुलींसाठी महत्त्वाची शिष्यवृत्ती आहे. 10वी किंवा 12वी उत्तीर्ण मुली ज्यांना पुढे Graduation किंवा Diploma करायचे आहे त्या अर्ज करू शकतात. निवडलेल्या विद्यार्थिनींना वर्षाला 30,000 रुपये पर्यंत मदत मिळते, ती दोन हप्त्यांत दिली जाते. ही योजना देशातील निवडक राज्यांसाठी लागू आहे आणि उद्दिष्ट सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना उच्च शिक्षणाची संधी देणे आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे. या scholership related संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

हे वाचा

Reliance Foundation Scholarship 2026

Reliance Foundation Scholarship ही UG आणि PG विद्यार्थ्यांसाठी भारतातील सर्वात प्रतिष्ठित शिष्यवृत्तींपैकी एक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण academically strong विद्यार्थ्यांना मदत दिली जाते. UG विद्यार्थ्यांना 2 लाख आणि PG विद्यार्थ्यांना 6 लाख पर्यंत मदत दिली जाते. पात्र विद्यार्थ्यांची निवड ऑनलाइन अर्ज, दस्तऐवज पडताळणी आणि aptitude test/essay/interview द्वारे केली जाते. या स्कॉलरशिपमध्ये skill development, mentorship आणि career guidance यांचाही समावेश आहे. या scholership related संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

हे वाचा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..