मित्रांनो नाशिक येथे आदिवासी विकास विभागासमोर सुरू असलेल्या आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या बिन्हाड आंदोलनाला आता चार महिने पूर्ण झाले आहेत. राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये बाह्यस्रोत (कंत्राटी) भरतीच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. वर्ग ३ आणि वर्ग ४ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या जागांवर खासगी कंपनीमार्फत १७९१ पदांची भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याविरोधात महाराष्ट्र राज्य शासकीय आश्रमशाळा कर्मचारी संघटनेने ९ जुलैपासून अनिश्चितकाळासाठी आंदोलन सुरू केले.
आंदोलकांनी शहरात मोर्चे काढले, आदिवासी महापंचायत घेतली आणि अखेर पायी प्रवास करून मुंबईपर्यंत मोर्चा काढला. आझाद मैदानावर ठिय्या धरल्यानंतर आंदोलकांनी राज्यपालांची भेट घेऊन मागण्यांचे पत्र सादर केले. मात्र, राज्यपालांनी या मागण्या शासनाच्या पातळीवरील असल्याचे सांगून निर्णय घेण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलक निराश झाले असून आंदोलनाचा ताण वाढत आहे.
दरम्यान, राज्यात विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने शासन कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी या काळात या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता अत्यल्प आहे.
या आंदोलनामुळे शाळांमधील शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. खासगी कंपनीमार्फत नेमलेले शिक्षक कामावर रुजू झाले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवेत खंड पडल्याने त्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.
राज्यपालांकडून मागण्या फेटाळल्यानंतर आंदोलन पुन्हा तीव्र करण्याची तयारी सुरू आहे. शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. सध्या मात्र आचारसंहिता संपेपर्यंत हा प्रश्न प्रलंबित राहणार हे निश्चित आहे.
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..






