मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने SBI Clerk Mains Admit Card 2025 अधिकृतपणे जाहीर केले आहेत. प्रिलिम्स परीक्षा पूर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. प्रवेशपत्र डाउनलोड लिंक सक्रिय झाली असून उमेदवारांना आता त्यांच्या मेन्स परीक्षेचे हॉल टिकट सहज डाउनलोड करता येणार आहे.
Admit Card डाउनलोड करण्याची शेवटची तारीख
उमेदवारांना 14 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आपले हॉल टिकट डाउनलोड करता येतील. या कालावधीतच Admit Card डाउनलोड करणे आवश्यक आहे, कारण परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्राशिवाय परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळत नाही.
SBI Clerk Mains Admit Card 2025 कसे डाउनलोड करावे?
- Admit Card डाउनलोड करणे खूप सोपे आहे.
- सर्वप्रथम उमेदवारांनी https://sbi.bank.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- तेथील Career सेक्शनमध्ये जाऊन Recruitment of Junior Associates (Customer Support & Sales) हा पर्याय निवडावा.
- त्यानंतर Call Letter for Online Main Examination या लिंकवर क्लिक केल्यावर IBPS ची साइट उघडेल.
- नंतर तुमचा Registration Number व Password/जन्मतारीख भरून लॉगिन करा.
- सबमिट केल्यानंतर तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल आणि तुम्ही डाउनलोड करू शकता.
प्रवेशपत्रावर कोणती माहिती असते?
हॉल टिकटवर उमेदवाराशी संबंधित अनेक महत्त्वाच्या माहिती असतात. तुमचे नाव, रोल नंबर, फोटो, जेंडर, जन्मतारीख, पालकांचे नाव, परीक्षा शिफ्ट, रिपोर्टिंग टाइम, परीक्षा केंद्राचे नाव व पूर्ण पत्ता अशी सर्व माहिती त्यात दिलेली असते. ही माहिती नीट तपासणे आवश्यक आहे.
परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे
परीक्षेच्या दिवशी उमेदवारांनी काही कागदपत्र सोबत असणे अनिवार्य आहे. यात मुख्य म्हणजे हॉल टिकट, एक Valid Photo ID (Aadhaar Card, PAN, Driving License इ.) आणि एक पासपोर्ट साईज फोटो. या कागदपत्रांशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
SBI Clerk Mains Exam Pattern 2025
एसबीआय क्लर्क मेन्स परीक्षेत एकूण 190 प्रश्न विचारले जातील.
| विभाग (Section) | प्रश्न | गुण | वेळ |
|---|---|---|---|
| General / Financial Awareness | 50 | 50 | 35 मिनिटे |
| General English | 40 | 40 | 35 मिनिटे |
| Quantitative Aptitude | 50 | 50 | 45 मिनिटे |
| Reasoning Ability & Computer Aptitude | 50 | 60 | 45 मिनिटे |
एकूण परीक्षा संरचना:
- एकूण प्रश्न: 190
- एकूण गुण: 200
- एकूण वेळ: 160 मिनिटे
- निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा
- Sectional Timing लागू
- Final Selection = Mains Marks + Language Test
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.







