Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात 18 जुलै ला घोषणा केली की, राज्यात लवकरच 13,560 पेक्षा अधिक पदांसाठी मेगा पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. ही भरती ऑक्टोबर 2025 पासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलीस भरती Selection Process 2025 Maharashtra Police Bharti Syllabus And Exam Pattern पोलीस भरती Physical Test पोलीस भरती लवकरच 13,560 पदांची मेगा भरती 2025

Maharashtra Police Bharti 2025 उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की गृह विभागाकडून भरतीसाठी मंजुरी मिळालेली आहे. मागील काही वर्षांपासून अनेक युवक पोलीस होण्याचं स्वप्न पाहत होते, परंतु विविध कारणांमुळे त्यांना संधी मिळाली नव्हती. आता मात्र त्यांच्यासमोर पुन्हा एकदा पोलीस दलात सामील होण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अभ्यासाला आणि शारीरिक तयारीला सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

एकाच जिल्ह्यासाठी एकच अर्ज..

Maharashtra Police Bharti 2025 या भरती प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. यावेळी उमेदवारांना केवळ एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. म्हणजेच, उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे, त्याच जिल्ह्यातून अर्ज करता येईल. हे धोरण भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि स्थानिकांना प्राधान्य मिळण्यासाठी आखण्यात आले आहे.

#Police bharti updates
♦️ 13560 नवीन पोलीस भरती पदे..
अभ्यास करा पोट्टे हो pic.twitter.com/lDP71BOmer

— विकास सूर्यवंशी (LATUR) (@VBHAUSpeaks) July 18, 2025

भरतीमध्ये कोणकोणती पदे असतील?

Maharashtra Police Bharti 2025 या मेगा भरतीत खालील पदांचा समावेश असणार आहे:

  • पोलीस शिपाई (Constable)
  • पोलीस शिपाई बँड्समन
  • पोलीस शिपाई चालक (Driver)
  • राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार (SRPF Constable)
हे वाचा

ही भरती संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी राबवली जाणार आहे आणि मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे.

शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा

Police Bharti 2025 भरतीसाठी उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा या दोन मुख्य टप्प्यांमध्ये होणार आहे.
सर्वप्रथम उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाईल — ज्यामध्ये धावणे, उंची, वजन, लांब उडी, गोळाफेक अशा चाचण्या असतील. यानंतर पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल आणि ती बहुधा मराठी भाषेत घेतली जाईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात घोषणा

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या भरतीचा मुद्दा उपस्थित झाला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, गृह विभागाकडून मंजुरी मिळालेली असून Maharashtra Police Bharti 2025 भरती प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. यावेळी त्यांनी विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावांवरही भाष्य केले आणि सरकारकडून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी देण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट केले.

अधिकृत माहिती कधी जाहीर होईल?

मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, भरती प्रक्रिया ऑक्टोबर 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिरात लवकरच पोलीस विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. त्यामध्ये पदांची अचूक संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची तारीख आणि परीक्षा पद्धत याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येईल.

Maharashtra Police Bharti Vacancy 2025

Maharashtra Police Bharti 2025

  • एकूण पदांची संख्या : 13,560 पेक्षा जास्त पदे.
  • शैक्षणिक पात्रता : लवकरच उपलब्ध.
  • वेतन : लवकरच उपलब्ध.
  • अर्ज शुल्क : लवकरच उपलब्ध.
हे वाचा
Telegram चॅनेल जॉईन करायेथे क्लिक करा
WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Visit – Formwalaa

Visit Official Site: Maharashtra Police