Maharashtra Police Bharti Syllabus And Exam Pattern २०२५: महाराष्ट्र पोलीस विभागामार्फत 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मेगा भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत आणि तयारी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपण आजच्या या पोस्ट च्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस भरती 2025 चा संपूर्ण अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत (Syllabus & Exam Pattern) यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Maharashtra Police Bharti Syllabus 2025 (अभ्यासक्रम)
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा पद्धत (Exam Pattern)
Maharashtra Police Bharti Syllabus And Exam Pattern: महाराष्ट्र पोलीस भारती च्या लेखी परीक्षेत ऐकून चार विषय असून यामधील प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी १ गुण असणारे एकूण प्रश्न असतील. सविस्तर परीक्षेचा नमुना खाली दिलेल्या टेबलनुसार असणार आहे.
- परीक्षा एकूण १०० गुणांची असेल
- MCQ प्रश्नांचा समावेश असेल.
- प्रत्येक विषयात २५ प्रश्न असतील.
- प्रत्येक बरोबर उत्तरासाठी उमेदवारांना १ गुण मिळेल.
- परीक्षा वेळ हा एकूण १ तास ३० मिनिटे असेल.
Maharashtra Police Bharti Syllabus And Exam Pattern
| विषय | प्रश्न | गुण | वेळ |
| सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | २५ | २५ | १ तास ३० मिनिटे |
| मराठी व्याकरण | २५ | २५ | |
| गणित | २५ | २५ | |
| बौद्धिक चाचणी | २५ | २५ | |
| एकूण | १०० | १०० |
Note: पात्रता किमान 40% किंवा 50% गुण आवश्यक (दिलेल्या पोस्ट प्रमाणे), परीक्षेचे स्वरूप MCQ प्रश्न आहेत यासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही. (कृपया अधिकृत जाहिरात वाचावी.)
पोलीस भरती अभ्यासक्रम 2025 (Police Bharti Syllabus in Marathi)
Maharashtra Police Bharti Syllabus 2025 परीक्षेतील प्रत्येक घटकासाठी अभ्यासक्रम खाली दिला आहे
लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम Maharashtra Police Bharti Syllabus And Exam Pattern:
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींसाठी
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी विषयकरिता तयारी करण्याचे विषय म्हणजे क्रीडा, राजकारण, अर्थशास्त्र, आणि महाराष्ट्रातील इतिहास इत्यादी. महाराष्ट्र पोलीस लेखी परीक्षेच्या या विषयासाठी तयार करायचे इतर विषय खालील प्रमाणे असतील.
- राजकारण
- अर्थशास्त्र
- इतिहास
- भूगोल
- संगणक ज्ञान
- विज्ञान आणि तंत्रज्ञान
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी
- क्रीडा
- राष्ट्रीय चळवळी
- साहित्य आणि परंपरा
मराठी व्याकरणासाठी
मराठी व्याकरण विषयात एकूण २५ प्रश्न विचारले जातील, महाराष्ट्र पोलीस परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी या विषयाची तयारी खूप महत्वाची ठरते यामध्ये मराठी भाषेतील संपूर्ण ज्ञान असायला हवे यासाठी खालील टॉपिकस असणार आहेत
- व्याकरण
- समानार्थी शब्द
- विरुद्धर्थी शब्द
- अलंकारिक शब्द
- लिंग
- वचन
- संधि
- मराठी वर्णमाला
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियापद
- काळ
- प्रयोग
- समास
- वाक्प्रचार
- म्हणी
गणित
Maharashtra Police Bharti Syllabus And Exam Pattern Mathematics
महाराष्ट्र पोलीस लेखी परीक्षेत गणिताचे मूलभूत प्रश्न विचारले जातील. ज्या विषयांवरून प्रश्न विचारले जातील त्यापैकी बहुतेक विषय प्राथमिक गणितावर आधारित असतील, या विषयाची तयारी करण्यासाठी खालील यादी पहा
- संख्या व संख्याचे प्रकार
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
- कसोट्या
- पूर्णाक व त्याचे प्रकार
- अपूर्णांक व त्याचे प्रकार
- म.सा.वी आणि ल.सा.वी.
- वर्ग व वर्गमूळ
- घन व घनमूळ
- शेकडेवारी
- भागीदारी
- गुणोत्तर व प्रमाण
- सरासरी
- काळ, काम, वेग
- दशमान पद्धती
- नफा-तोटा
- सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- घड्याळावर आधारित प्रश्न
- घातांक व त्याचे नियम
बौद्धिक चाचणीसाठी
बौद्धिक चाचणी विषयात ह्या विषयांवरून प्रश्न विचारले जातील ते म्हणजे नफा आणि तोटा, रक्ताचे नाते, कोडिंग-डिकोडिंग इत्यादी. बौद्धिक चाचणी विभागात अभ्यास करताना उमेदवारांनी कोणत्या विषयांची तयारी करावी लागेल याची संपूर्ण यादी खालील प्रमाणे असेल.
- संख्या मालिका
- अक्षर मालिका
- व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
- सांकेतिक भाषा
- सांकेतिक लिपि
- दिशावर आधारित प्रश्न
- नाते संबध
- घड्याळावर आधारित प्रश्न
- तर्कावर आधारित प्रश्न
पंचायतराज Panchayatraj
- ग्रामप्रशासन
- समिती व शिफारसी
- घटनादुरूस्ती
- ग्रामसभा व ग्रामपंचायत
- ग्रामसेवक
- पंचायत समिती
- जिल्हा परिषद
- मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
- गटविकास अधिकारी BDO
- नगरपरिषद / नगरपालिका
- महानगरपालिका
- ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
Note: महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत Negative Marking नाही. त्यामुळे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
Maharashtra Police Bharti Syllabus And Exam Pattern: महाराष्ट्र पोलीस भरती 2025 या सुवर्णसंधीचा योग्य फायदा घेण्यासाठी वरील दिलेल्या अभ्यासक्रम प्रमाणे आणि इच्छाशक्तीने आजच तयारी सुरू करा. पण लक्षात राहूद्या लेखी परीक्षा प्रमाणेच शारीरिक चाचणी कडेही लक्ष राहू द्या आणि तुमची Police Bharti 2025 ची तयारी आजपासूनच जोमात सुरू करा.
पोलीस विभागातील ताज्या अपडेटसाठी आणि भारतीसंदर्भातील महत्त्वाच्या जाहिराती, प्रवेशपत्र, व निकाल माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला नियमित भेट देत राहा.
Visit Official Site: Maharashtra Police
Visit: Formwalaa






