Maharashtra Police Bharti Physical Test: महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी (Physical Test) ही एक अत्यंत महत्त्वाची चाचणी असते. यातील उत्तीर्ण उमेदवारांनाच लेखी परीक्षेसाठी पात्र केले जाते. ही चाचणी मैदानी स्वरूपात (Ground Test) च्या माध्यमातून घेतली जाते आणि त्या आधारेच उमेदवाराच्या निवडीस पात्रता दिली जाते. यामध्ये उमेदवारांना किंमत 40% गुन मिळवणे आवश्यक असते. तर आजच्या या पोस्ट मध्ये आपन शारीरिक चाचणी (Physical Test) बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये विविध पदासाठी वेगवेळी Physical टेस्ट घेतली जाईल हे आपण सविस्तर पाहणार आहोत.
पोलीस भरती शारीरिक चाचणीमध्ये काय काय असते?
शारीरिक चाचणीमध्ये उमेदवाराच्या धावण्याची क्षमता, गोळा फेक कौशल्य, वेग आणि सहनशक्ती यांची चाचणी घेतली जाते. खाली उमेदवाराच्या पदानुसार शारीरिक चाचणीची सविस्तर माहिती आपण उपलब्ध केली आहे.
Maharashtra Police Bharti Physical Test महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी होत असताना शारीरिक चाचणी देखील घेतली जाते. शारीरिक चाचणी मध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो. शारीरिक चाचणी कशासाठी किती गुण असतात. संपूर्ण माहिती तुम्हाला सरळ आणि सोप्या मराठी भाषेत येथे मिळेल. पोलीस शिपाई पदाकरिता व सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता पोलीस भरती शारीरिक चाचणी कशी घेतली जाते याबद्दल संपूर्ण माहिती खाली पहा.
पोलीस भरती शारीरिक चाचणी (Maharashtra Police Bharti Physical Test)
Male Candidate Criteria:
| चाचणी | गुण |
| 1600 मीटर धावणे | 20 गुण |
| 100 मीटर धावणे | 15 गुण |
| गोळा फेक | 15 गुण |
| एकूण गुण | 50 गुण |
मुलींसाठी पोलीस भरती शारीरिक चाचणी Female Candidate Criteria:
| चाचणी | गुण |
| 800 मीटर धावणे | 30 गुण |
| गोळा फेक | 20 गुण |
| एकूण गुण | 50 गुण |

पोलीस शिपाई चालक पदासाठी शारीरिक चाचणी (Police Shipai Chalak Padakarita Physical Test)
Maharashtra Police Bharti Physical Test अंतर्गत पोलीस शिपाई चालक पदासाठी निवड प्रक्रिया इतर पदांपेक्षा वेगळी असते. यामध्ये शारीरिक चाचणीसह वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी घेतली जाते.
पुरुष उमेदवार (Male Driver)
| चाचणी | गुण |
|---|---|
| 1600 मीटर धावणे | 30 गुण |
| गोळा फेक | 20 गुण |
| एकूण गुण | 50 गुण |
महिला उमेदवार (Female Driver)
| चाचणी | गुण |
|---|---|
| 800 मीटर धावणे | 30 गुण |
| गोळा फेक | 20 गुण |
| एकूण गुण | 50 गुण |

शारीरिक चाचणी पूर्ण केल्यानंतर पात्र उमेदवारांची वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी घेतली जाते. या चाचणीत 50 गुण असतात.
| चाचणी | गुण |
|---|---|
| हलके वाहन (LMV) चालवण्याची चाचणी | 25 गुण |
| अवजड वाहन / विशेष पोलीस वाहन चालवणे | 25 गुण |
| एकूण कौशल्य चाचणी गुण | 50 गुण |
SRPF सशस्त्र पोलीस शिपाई शारीरिक चाचणी (SRPF Physical Test)
SRPF (State Reserve Police Force) भरतीसाठी शारीरिक चाचणी अधिक तीव्र असते आणि एकूण 100 गुणांची असते.
Male:
| चाचणी | गुण |
| 5 किलोमीटर धावणे | 50 गुण |
| 100 मीटर धावणे | 25 गुण |
| गोळा फेक | 25 गुण |
| एकूण गुण | 100 गुण |

पोलीस शिपाई बँड्समन शारीरिक चाचणी (Police Shipai Bandsman Physical Test)
पोलीस शिपाई बँड्समन पदासाठीही शारीरिक चाचणी घेतली जाते. यामध्ये मुख्यतः शारीरिक क्षमतेची चाचणी आणि बँड वाद्य वाजवण्याचे कौशल्य तपासले जाते. काही विभागांमध्ये शारीरिक चाचणीसह कौशल्य चाचणीसाठी स्वतंत्र गुण दिले जातात.
Male Candidate Criteria:
| चाचणी | गुण |
| 1600 मीटर धावणे | 20 गुण |
| 100 मीटर धावणे | 15 गुण |
| गोळा फेक | 15 गुण |
| एकूण गुण | 50 गुण |
Female Candidate Criteria:
| चाचणी | गुण |
| 800 मीटर धावणे | 30 गुण |
| गोळा फेक | 20 गुण |
| एकूण गुण | 50 गुण |
Note: काही विभागांमध्ये बँड्समन पदासाठी उमेदवाराकडून वाद्य वाजवण्याचे प्रात्यक्षिक (Band Skill Test) घेतले जाते. यासाठी वेगळ्या गुणांची विभागणी असू शकते.
महाराष्ट्र पोलीस भरती उंची पात्रता
Maharashtra Police Bharti Physical Test Height Eligibility:
पुरुष उमेदवारांसाठी (Male Candidates)
| प्रवर्ग | किमान उंची (सें.मी.) |
|---|---|
| सर्वसाधारण (Open Category) | 165 सेमी |
| अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) | 165 सेमी |
| ओबीसी / इतर मागासवर्गीय | 165 सेमी |
| सशस्त्र पोलीस दल (SRPF) | 167 सेमी |
महिला उमेदवारांसाठी (Female Candidates)
| प्रवर्ग | किमान उंची (सें.मी.) |
|---|---|
| सर्वसाधारण (Open Category) | 158 सेमी |
| अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) | 155 सेमी |
| ओबीसी / इतर मागासवर्गीय | 158 सेमी |

Note: SRPF (सशस्त्र पोलीस) भरतीसाठी अधिक उंचीची आवश्यकता असते.

पोलीस भरती शारीरिक चाचणीबाबत महत्त्वाची माहिती
- शारीरिक चाचणीची किमान पात्रता: 40% गुण मिळणे आवश्यक
- लेखी परीक्षेसाठी देखील 40% गुण आवश्यक
- एकत्रित निकाल: लेखी + शारीरिक दोन्ही परीक्षांमध्ये मिळून किमान 40% गुण आवश्यक
Update 2025
उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
Maharashtra Police Bharti Physical Test शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत रलल्या उमेदवाराचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. निवडसूचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये. शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.
- मित्रांनो, पोलीस भरतीसाठी या वर्षी प्रथम Maharashtra Police Physical Test 2025 घेण्यात येणार आहे.
- तसेच लक्षात ठेवा, Maharashtra Police Physical Test 2025 ही 50 मार्क्सची असेल.
- Maharashtra Police Physical Test 2025 मध्ये 50 टक्के गुण (एकूण 25 गुण) मिळवणाऱ्या उमेदवारास लेखी परीक्षेस पात्र ठरवल्या जाईल
- शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतील.
विचारले जाणारे प्रश्न
पोलीस भरती फिजिकल टेस्ट किती गुणांची असते?
पोलीस शिपाईसाठी 50 गुणांची तर SRPF सशस्त्र पोलीस भरतीसाठी 100 गुणांची असते.
पोलीस भरतीत धावण्यासाठी किती वेळ दिला जातो?
सामान्यतः 1600 मीटर धावण्यासाठी 6 मिनिटांच्या आत वेळेची अपेक्षा असते.
महिला उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी वेगळी असते का?
होय, महिलांसाठी 800 मीटर धावणे व गोळा फेक अशा दोन चाचण्या असतात.
पोलीस भरती शारीरिक चाचणीसाठी कोणती तयारी करावी?
दररोज धावण्याचा सराव, स्टॅमिना वाढवणे, पोषणयुक्त आहार घेणे, नियमित वॉर्म-अप व स्ट्रेचिंग करणे आवश्यक.
मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती ही फक्त नोकरी नाही तर सेवेचं एक महान ध्येय आहे. शारीरिक चाचणी म्हणजे तुमच्या मेहनतीची आणि शिस्तीची खरी परीक्षा आहे. रोजचा सराव, आत्मविश्वास आणि “मी करू शकतो” ही जिद्द तुम्हाला नक्कीच यश देईल. ताकद शरीरात हवी, पण खरी ताकद मनात असते. जिद्द असेल तर पोलीस गणवेश घालणे हे तुमचं स्वप्न नाही, तर सत्य ठरेल.
सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि नवीन अपडेट मिळावा
| Telegram चॅनेल जॉईन करा | येथे क्लिक करा |
| WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Visit – Formwalaa
Visit Official Site: Maharashtra Police
Maharashtra Police Bharti Physical Test: महाराष्ट्र पोलीस भरतीत यश मिळवण्यासाठी शारीरिक चाचणी ही एक निर्णायक पायरी आहे. त्यामुळे दररोज नियमित सराव करणे गरजेचे आहे. वरील सर्व माहितीचा अभ्यास करून तयारीला सुरुवात करा….






